Join us

अभिनव भारत आणि सनातन संस्थेवर बंदी घाला, अबु आझमींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 15:57 IST

सरकारने अभिनव भारत आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती आमदार अबु आझमी दिली आहे.

मुंबई : सरकारने अभिनव भारत आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती आमदार अबु आझमी दिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात अबु आझमी यांनी आज पत्रकार परिषद घेण्यात आली.

नालासोपारा येथून अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह तिघांविरोधात कारवाई करणा-या एटीएसच्या अधिका-यांना संरक्षण देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. सरकारसह एटीएसने केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. मात्र हा कट स्वातंत्र्यदिनासाठी नसून बकरी ईदसाठी करण्यात आल्याचा आरोपही यावेळी अबु आझमी यांनी केला आहे. 

दरम्यान, सरकारने या माथेफिरूंपासून मुस्लिमांचे संरक्षण करण्यासाठी ईददिवशी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याची मागणी सुद्धा अबु आझमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती दिली.  

टॅग्स :अबू आझमीमुंबईमहाराष्ट्र