वाढीव वीज बिलाचा मुद्दा ठरणार कळीचा
By Admin | Updated: October 5, 2014 00:52 IST2014-10-05T00:52:27+5:302014-10-05T00:52:27+5:30
दक्षिण मुंबईत बेस्टच्या वाढीव वीज बिलाचा प्रश्न आजही ‘जैसे थे’ आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून वारंवार तक्रार करूनही हजारो रुपयांची बिले मुंबईकरांच्या माथी मारली जात आहेत.

वाढीव वीज बिलाचा मुद्दा ठरणार कळीचा
>मुंबई : दक्षिण मुंबईत बेस्टच्या वाढीव वीज बिलाचा प्रश्न आजही ‘जैसे थे’ आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून वारंवार तक्रार करूनही हजारो रुपयांची बिले मुंबईकरांच्या माथी मारली जात आहेत. या मुद्दय़ावर निवडणुकीत शिवसेना भाजपाच्या उमेदवारांची गोची होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून 5 हजार ते 5क् हजार रुपयांर्पयतची वीज बिले मुंबईकरांना येत आहेत. याबाबत वारंवार तक्रार करून, मोर्चे काढून आंदोलन उभारणा:या मुंबईकरांच्या पदरी बेस्ट प्रशासनाची आश्वासनेच आली आहेत. त्यामुळे हा मुद्दा कळीचा मुद्दा म्हणून वापरणार असल्याचे रोहिदास लोखंडे यांनी सांगितले. हुजैफा इलेक्ट्रीकवाला या मुद्दय़ावर भाष्य करताना म्हणाले, ‘गेल्या दोन वर्षापासून बेस्टच्या वीज मीटरसाठी काढण्यात येणा:या निविदांवर आक्षेप घेत आहे. मुळात उपनगरात इतर कोणतीही कंपनी मीटरसाठी निविदा काढत नाही. कारण उत्तम प्रकारचे मीटर नसतील, तर बिलात तफावतीसारखे प्रकार घडतच राहणार. त्यामुळे उत्कृष्ट दर्जाचे मीटर खरेदी करून बेस्टने या त्रसातून मुंबईकरांची सुटका करण्याची गरज आहे. बेस्टचा स्थायी समिती अध्यक्ष शिवसेनेचा असतानाही या प्रश्नाची दाहकता आजही मुंबईकरांना सहन करावी लागत आहे.
याबाबत लोखंडे यांनी सांगितले, ‘वाढीव वीज बिलावर वारंवार तक्रारी आणि आंदोलने केल्यावर बेस्टच्या व्यवस्थापकीय संचालकांनी वीज बिलातील दोष दूर होत नाहीत, तोर्पयत वीज बिल भरू नये, असे सांगितले होते. तर सदोष मीटरमुळे आलेली बिले भरली नाही तर बेस्ट प्रशासन वीज कापणार नाही, असे आश्वासनही दिले होते. मात्र बिल भरले नाही तर बेस्टचे अधिकारी मीटर कापण्यासाठी घराबाहेर उभे राहत आहेत.’ बेस्ट समिती हातात असलेल्या शिवसेना-भाजपाचे दक्षिण मुंबईतील नगरसेवक मूग गिळून गप्प असल्याने आजही मुंबईकरांना हा त्रस सहन करावा लागत असल्याचे लोखंडे म्हणाले. (प्रतिनिधी)