अटकेनंतर माजी बँक व्यवस्थापकाला जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:07 IST2020-12-31T04:07:38+5:302020-12-31T04:07:38+5:30

मुंबई : सासऱ्यासह भावाच्या बँक खात्यात गेल्या वर्षी एक कोटीपेक्षा जास्त रुपये ट्रान्स्फर करणारा माजी बँक व्यवस्थापक धीरेंद्र शर्मा ...

Bail to former bank manager after arrest | अटकेनंतर माजी बँक व्यवस्थापकाला जामीन

अटकेनंतर माजी बँक व्यवस्थापकाला जामीन

मुंबई : सासऱ्यासह भावाच्या बँक खात्यात गेल्या वर्षी एक कोटीपेक्षा जास्त रुपये ट्रान्स्फर करणारा माजी बँक व्यवस्थापक धीरेंद्र शर्मा याला मरीन ड्राइव्ह पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अटकेनंतर १५ हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका झाली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

.................................

घाटकोपरमधून हेरॉईनचा साठा जप्त

मुंबई : घाटकोपरमध्ये राजस्थानमधील ड्रग्ज माफिया हेरॉईनच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच, पथकाने सापळा रचून आरोपीला गेल्या आठवड्यात अटक केली. यात ड्रग्जमाफिया एजाज शेरखानकडून २० लाखांचे ६२० ग्रॅम हेरॉईन जप्त केले.

..................................................

वकिलाच्या डेबिट कार्डवरून ठगाची खरेदी

मुंबई : चिराबाझारमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय वकिलाच्या डेबिट कार्डवरून ठगाने खरेदी केली. तक्रारदार यांनी २७ तारखेला गिरगाव येथील एटीएममधून पैसे काढून ते कामावर निघून गेले. मात्र, कार्ड तेथेच विसरले. ठगाने त्यांच्या कार्डवरून दोन व्यवहारात एक हजार ९९४ रुपयांवर डल्ला मारला.

...................................

Web Title: Bail to former bank manager after arrest