बदलापूरच्या उपनगराध्यक्षांवर तलवारीने हल्ला

By Admin | Updated: January 29, 2017 03:22 IST2017-01-29T03:22:54+5:302017-01-29T03:22:54+5:30

कुळगाव-बदलापूरचे उपनगराध्यक्ष शरद तेली यांच्यावर दोन अनोळखी तरु णांनी शनिवारी रात्री ८ च्या सुमारास तलवारीने हल्ला केल्याची घटना बदलापुरात घडली आहे.

Badlapur deputy superintendent of police raided the sword | बदलापूरच्या उपनगराध्यक्षांवर तलवारीने हल्ला

बदलापूरच्या उपनगराध्यक्षांवर तलवारीने हल्ला

बदलापूर : कुळगाव-बदलापूरचे उपनगराध्यक्ष शरद तेली यांच्यावर दोन अनोळखी तरु णांनी शनिवारी रात्री ८ च्या सुमारास तलवारीने हल्ला केल्याची घटना बदलापुरात घडली आहे.
तेली हे प्रभागातील सोसायटीत पूजेसाठी गेले होते. तेथून ते कार्यकर्त्यांसमवेत परतत असताना दबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला. मात्र, वार चुकल्याने त्यांच्या मानेवर तलवारीची धार नसलेली बाजू लागली आणि त्यात ते खाली पडले. हा हल्ला नक्की कोणत्या कारणांमुळे झाला आणि तो कोणी केला, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
दरम्यान, तेली यांना उपचारासाठी बदलापुरातील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तसेच रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. (प्रतिनिधी)

Web Title: Badlapur deputy superintendent of police raided the sword