Join us  

विनामास्क फिरणाऱ्यांवर बडगा, ११७२ जणांवर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 3:13 AM

दंडाची रक्कम एक हजार रुपयांवरून दोनशे रुपये केल्यानंतर हे प्रमाण आणखीनच वाढले आहे. त्यामुळे आता पोलिसांचा दंडुका दाखवून कारवाई करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.

मुंबई : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगबरोबरच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे अत्यावश्यक आहे. मात्र अशी सूचना वारंवार करूनही अनेक ठिकाणी नागरिक तोंडाला मास्क न लावताच फिरताना दिसून येत आहेत.दंडाची रक्कम एक हजार रुपयांवरून दोनशे रुपये केल्यानंतर हे प्रमाण आणखीनच वाढले आहे. त्यामुळे आता पोलिसांचा दंडुका दाखवून कारवाई करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. गेल्या तीन-चार दिवसात या कालावधीतच अशा ११७२ लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.कोरोनाचा प्रभाव आणखीन दोन-तीन महिने कायम राहणार असल्याने मुंबईकरांना आपल्या जीवनशैलीत बदल घडवून तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. मंगळवारपासून सुरू करण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन मुंबईकरांचे मार्गदर्शनही केले जात आहे. परंतु काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे समोर आले आहे.नियमांचे उल्लंघन करणाºया अशा लोकांना आता पोलिसांचा दंडुका दाखवून मास्कचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरात अशा पद्धतीने कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जुलै आणि आॅगस्ट महिन्यात केवळ ७३३ लोकांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र गेल्या तीन-चार दिवसात तब्बल ११७२ लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. तर मास्क चुकीच्या पद्धतीने लावणाºया६६१ लोकांना समज देऊन सोडण्यात आले आहे.- एप्रिल ते आॅगस्टपर्यंत दोन हजार ७९८ नागरिकांकडून एक हजार रुपयांप्रमाणे २७ लाख ४८ हजार ७०० एवढा दंड पालिकेने वसूल केला आहे. मंगळवारपासून दंडाची रक्कम दोनशे रुपये केल्यानंतर आतापर्यंत दोन लाख ७३ हजार दंड वसूल केला आहे.- प्रत्येक विभाग स्तरावर विशेष पथक स्थापन केले असून मास्क कशा पद्धतीने लावावेत व मास्क लावणे का आवश्यक आहे? याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.- गेल्या दोन महिन्यांपासून आर मध्य-बोरीवली हॉटस्पॉट बनला आहे. या विभागात १२०० इमारती सील आहेत. तीन दिवसांत विनामास्क फिरणाºया १९८ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. मरीन ड्राइव्ह येथे प्रभातफेरीसाठी येणारे बहुतांश नागरिक विनामास्क फिरत असल्याचे आढळून आले आहे. मलबार हिल, ताडदेव, कांदिवलीमध्ये सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस