बालनाटय़ ही खूप कठीण गोष्ट - मतकरी
By Admin | Updated: November 13, 2014 23:13 IST2014-11-13T23:13:15+5:302014-11-13T23:13:15+5:30
पूर्वी बालनाटय़ातल्या मुलांची जी ऊर्जा होती, ती आजही कायम आहे. उलट काळाच्या ओघात त्यांची कल्पनाशक्ती आता अधिकच वाढली आहे.

बालनाटय़ ही खूप कठीण गोष्ट - मतकरी
मुंबई : पूर्वी बालनाटय़ातल्या मुलांची जी ऊर्जा होती, ती आजही कायम आहे. उलट काळाच्या ओघात त्यांची कल्पनाशक्ती आता अधिकच वाढली आहे. मात्र मुले जे काही सध्या टी.व्ही.वर पाहतात किंवा त्यांच्या हाती जी काही कॉमिक्स पडतात किंवा कॉम्प्युटरवर जो काही वेळ घालवतात, या पाश्र्वभूमीवर पुढील काळात बालनाटय़ पाहण्याकडे त्यांचा ओढा कसा वाढेल हे आव्हान आज बालरंगभूमीसमोर असल्याचे मत नाटककार, लेखक आणि बालरंगभूमीचे प्रणोते र}ाकर मतकरी यांनी बालदिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
आज बालनाटय़ाचे प्रयोग करणो कठीण वाटत असले, तरी पूर्वीही ते कठीणच होते. बालनाटय़ एकसाची होऊ नये म्हणून त्यात विविध प्रयोग केले जातात. आम्ही बालनाटय़ हे मुलांसाठी करत असतो; मुलांकडून करून घेत नसतो. मुलांसाठी नाटक करताना मुलांची सोय बघणो महत्त्वाचे होते. एक साधारण रीत अशी होती की बालनाटय़ातल्या मुलांच्या भूमिकेसाठी मुले आणि त्यातल्या मोठय़ांच्या भूमिकेसाठी मोठे कलावंत घेतले जायचे. प्राण्यांची कामे लहान मुलांनी करायची असे एक ठरूनच गेले होते. मुलांसाठीच नाटक करायचे असल्याने मुलांची निवड असा काही प्रकार नव्हता; पण बालनाटय़ातल्या मोठय़ा कलावंतांसाठी उत्तम नट घेतले जायचे, असे सांगत मतकरी यांनी पूर्वीच्या आठवणी जागवल्या.
तेव्हाच्या बालनाटय़ातले गांभीर्य मात्र आता हरवलेले दिसते. आज या क्षेत्रत व्यावसायिकीकरणाने प्रवेश केला आहे. आमचा हेतू मात्र असा नव्हता. आम्ही बालनाटय़ जास्तीतजास्त स्वस्त कसे देता येईल हे पाहिले. शाळेत बालनाटय़ करताना मुलांच्या खाऊच्या पैशांत ते कसे देता येईल, याचा आम्ही विचार केला. अगदी रुपया, दोन रुपये असे त्या नाटकांचे दर असायचे. झोपडपट्टीत आम्ही विनामूल्य बालनाटय़े केली. मुलांचे वाढदिवस, पाटर्य़ा यासाठी जो खर्च केला जातो, तो बालनाटय़ पाहण्याकडे वळवावा, असे आवाहन आम्ही पालकांना करत होतो. त्यातून आम्ही रस्त्यावरच्या मुलांर्पयत बालनाटय़े पोहोचवली. उत्तम साहित्य, संहिता, संगीत मुलांपर्यंत पोहोचावे हाच आमचा हेतू होता. बालनाटय़ाचे नेपथ्य मुलांच्या सोयीनुसार तयार केले जायचे, मतकरी सांगतात.बालनाटय़ातून मुलांना समज येते, पण त्यांना शिकवणाराही तयारीचा असावा लागतो. मुलांच्या कार्यशाळेत होणारे संस्कार महत्वाचे असतात. आम्ही बालनाटय़े गांभीर्याने करत असू, त्यात व्यावसायिक हेतू नगण्य होता. बालनाटय़ातून सर्वावरच चांगले संस्कार व्हायचे, असे त्यांनी सांगितले. बालनाटय़ म्हणजे केवळ मुलांसाठी केलेली करमणूक नव्हे, तर बालनाटय़ ही खूप कठीण गोष्ट आहे. बालनाटय़ात खूप सर्जनशीलता, कल्पनाशक्ती लागते. सबंध जगात पाहिले तर एखादाच वॉंल्ट डिस्ने झालेला दिसतो. मुलांसाठी काम करणारे लोक हे खरे तर मोठय़ांसाठीही उत्तम थिएटर करणारे हवेत. कारण दोन्ही रंगभूमीचा पाया हा एकच आहे. त्याही वेळेला आम्ही दोन-चार लोकच बालनाटय़ासाठी काम करत होतो. पु.ल.देशपांडे, विजय तेंडुलकर, सई परांजपे यांनीही लहान मुलांची नाटके लिहिली, पण ते थोडक्यावर थांबले. अशा योग्यतेच्या लोकांनीच खरे तर बालरंगभूमी करायला पाहिजे. कुणीही उठावे आणि बालरंगभूमी करावी, अशी ती गोष्टच नाही. पण लोकांच्या हे लक्षात येत नाही. लोकांना वाटते, ती कुणालाही सरसकट करता येईल. पण तसे ते नाही, अशा शब्दात मतकरी आपले अनुभव सांगतात.
शब्दांकन : राज चिंचणकर