‘बॅड न्यूज बॅरेट’ आज मुंबईत!
By Admin | Updated: September 16, 2014 23:26 IST2014-09-16T23:26:29+5:302014-09-16T23:26:29+5:30
जगभरातील कुस्तीप्रेमींमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या डब्ल्यूडब्ल्यूई स्पर्धेचा भारतातदेखील एक विशिष्ट चाहतावर्ग आहे.

‘बॅड न्यूज बॅरेट’ आज मुंबईत!
मुंबई : जगभरातील कुस्तीप्रेमींमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या डब्ल्यूडब्ल्यूई स्पर्धेचा भारतातदेखील एक विशिष्ट चाहतावर्ग आहे. सध्या या स्पर्धेत काही वर्षापूर्वीच रॉ पदार्पण करून डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये आपला दबदबा निर्माण करणारा ‘बॅड न्यूज बॅरेट्’ला प्रत्यक्षात भेटण्याची सुवर्णसंधी मिळणार असल्याने मुंबईकरांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे बॅड न्यूज बॅरेट्सच्या या मुंबईभेटीच्या विविध कार्यक्रमांसाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक असेल.
भारतामध्ये डब्ल्यूडब्ल्यूई खेळाचा प्रसार करण्यासाठी व आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी बॅड न्यूज बॅरेट्स 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान मुंबईमध्ये येत आहे. स्टुअर्ट अलेक्झांडर बेनेट असे पूर्ण नाव असलेला बॅड न्यूज बॅरेट सध्या दुखापतीमुळे खेळापासून दूर असल्याने मुंबई भेटीवर आला आहे. या वेळी बॅरेट मुंबईतील
काही मॉल्समध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान चाहत्यांशी संवाद साधणार असून या खेळाच्या प्रसारासाठी प्रयत्न करणार आहे.
2क्1क् साली पहिल्या एनएक्सटी सिझनचे धक्कादायकरीत्या विजेतेपद पटकावल्यानंतर त्याच वर्षी जून महिन्यात बॅरेटने ‘रॉ’मध्ये यशस्वी पदार्पण
करीत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. इंग्लंडचा खेळाडू असलेल्या बॅरेटने व्यावसायिक कुस्तीपटू म्हणून आपली सुरुवात केल्यानंतर अभिनेता तसेच बेर-नकल बॉक्सर म्हणूनदेखील आपली छाप पाडली आहे. त्याचबरोबर बॅरेट प्रामुख्याने ओळखला जातो त्याच्या रिंगमधील
‘वेड बॅरेट’ या नावाने. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरील डब्ल्यूडब्ल्यूई
या व्यावसायिक स्पर्धेत मात्र तो ‘बॅड न्यूज बॅरेट’ या नावानेच ओळखला जातो. (प्रतिनिधी)
च्यानंतर 18 सप्टेंबरला सकाळी 1क् वाजता शारीरिकदृष्टय़ा अपंग असलेल्यांसोबत बॅरेट फुटबॉल खेळणार असून दुपारी 3.45 वाजता अंधेरी येथील इन्फिनिटी मॉल आणि 5.15 वाजता मालाड येथील इन ऑर्बिट मॉलमध्ये आपल्या चाहत्यांसोबत बॅरेट संवाद साधणार आहे. 19 सप्टेंबरला होणा:या पत्रकार परिषदेद्वारे भारतभेटीचा अनुभव सांगून बॅरेट मायदेशी ब्रिटनला परतेल.
च्17 सप्टेंबरला वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित ग्रँड पार्टीने आपल्या उपक्रमाची सुरुवात करताना बॅरेट या वेळी बॉलीवूड तसेच हॉलीवूडमधील स्टार्ससोबत धमाल उडवणार आहे.