बीएमडब्लू कार भेटीवरही शोभांची टीका
By Admin | Updated: August 29, 2016 23:38 IST2016-08-29T20:44:59+5:302016-08-29T23:38:40+5:30
ऑलिम्पिकमधल्या खेळाडूंना दिलेल्या बीएमडब्लू कार हा पांढरा ठरू नये, असं खोचक ट्विट करून नव्या वादाला फोडणी दिली

बीएमडब्लू कार भेटीवरही शोभांची टीका
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 -रिओला जा, सेल्फी काढा, रिकाम्या हाताने परत या, हा सर्व पैशांचा अपव्यय आहे, असं वादग्रस्त ट्विट करून नेटिझन्सचा रोष ओढवून घेणा-या शोभा डेंनी ट्विटरच्या माध्यमातून आणखी एक उपद्व्याप केला आहे. सचिननं ऑलिम्पिकमधल्या खेळाडूंना दिलेल्या बीएमडब्लू कार हा पांढरा हत्ती ठरू नये, असं खोचक ट्विट करून नव्या वादाला फोडणी दिली आहे.
खेळाडूंच्या उत्पन्नाच्या स्रोतावर शोभा डेंनी टिपण्णी केल्यानं नेटिझन्स शोभा डेंवर पुन्हा तुटून पडले आहेत. ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू सिंधू, कांस्यपदक मिळवणारी कुस्तीपटू साक्षी, जिम्नॅस्टिक दीपा कर्माकर यांना बीएमडब्लू कंपनीनं लक्झुरी कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या हस्ते कालच त्यांच्याकडे गाड्यांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्यावर शोभा डेंनी बोट ठेवलं आहे.
गाड्यांच्या चाव्या दिल्या आता त्या चालवण्यासाठी पैसे कोण देणार ?, असा खोचक सवाल ट्विट करून विचारला आहे. तसेच या बीएमडब्लू कार खेळाडूंसाठी पांढरा हत्ती ठरू नये, असंही वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे नेटिझन्स अक्षरशः त्यांच्यावर तुटून पडले आहेत.
Great ad for BMW. Who will pay for running these pricy beasts? Hoping they don't become white elephants for athletes pic.twitter.com/MX0od5sTt3
— Shobhaa De (@DeShobhaa) August 29, 2016