बेबी पाटणकरला जामीन मंजूर

By Admin | Updated: September 10, 2015 03:49 IST2015-09-10T03:49:12+5:302015-09-10T03:49:12+5:30

एमडी प्रकरणात बेबी पाटणकरविरुद्ध सकृतदर्शनी पुरावे नसल्याचे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने बुधवारी तिला ३० हजारांचा जामीन मंजूर केला.

Baby Patankar granted bail | बेबी पाटणकरला जामीन मंजूर

बेबी पाटणकरला जामीन मंजूर

मुंबई : एमडी प्रकरणात बेबी पाटणकरविरुद्ध सकृतदर्शनी पुरावे नसल्याचे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने बुधवारी तिला ३० हजारांचा जामीन मंजूर केला.
मरीन लाईन्स पोलीस ठाण्यातील हवालदार धर्मराज काळोखे याच्या सातारा येथील घरात पोलिसांना एमडी सापडले. हे एमडी बेबीने दिल्याचा आरोप धर्मराजने केला. त्यानुसार पोलिसांनी मे २०१५ मध्ये बेबीला अटक केली. यात जामीन मिळविण्यासाठी बेबीने सातारा जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज सातारा न्यायालयाने फेटाळला होता. अखेर जामीनासाठी बेबीने अ‍ॅड. एन. एन. गवाणकर व अ‍ॅड. मानस गवाणकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. अभय ठिपसे यांच्यासमोर याची सुनावणी झाली. बेबीनेच काळोखेला एमडी दिले याचा थेट पुरावा पोलिसांकडे नाही. तेव्हा तिला जामीन मंजूर करावा, अशी मागणी अ‍ॅड. एन. एन. गवाणकर यांनी केली. ती मान्य करत न्यायालयाने बेबीला जामीन मंजूर केला. तसेच सातारा न्यायालयाने जामीन नाकारताना त्याची विस्तृत कारणे नमूद केली नसल्याचा ठपकाही न्यायालयाने ठेवला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Baby Patankar granted bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.