ॲक्सिस बँक लुटण्याच्या तयारीत आलेल्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:06 IST2021-02-12T04:06:27+5:302021-02-12T04:06:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मालाडच्या पिंपरीपाडा येथील क्वीन मेरी शाळेजवळ असलेल्या ॲक्सिस बँकेत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला ...

Axis Bank robbery gang arrested | ॲक्सिस बँक लुटण्याच्या तयारीत आलेल्या टोळीला अटक

ॲक्सिस बँक लुटण्याच्या तयारीत आलेल्या टोळीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालाडच्या पिंपरीपाडा येथील क्वीन मेरी शाळेजवळ असलेल्या ॲक्सिस बँकेत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुरुवारी अटक करण्यात आले. कुरार पोलिसांनी त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारी हत्यारे देखील हस्तगत केली आहेत.

पिंपरीपाडा येथे ॲक्सिस बँकेचे एटीएम लुटण्यासाठी काही लोक येणार असल्याची माहिती कुरार पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करत पाच जणांना ताब्यात घेतले तर तिघे पसार झाले.

२ सुरे, २ कटावनी, नायलॉन दोरखंड, मिरची पूड, स्क्रू ड्रायव्हर, ३ मोटारसायकली व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सुबोध दीपक साळवी, सौरभ सुनील पास्टे, सिद्धेश मंगेश इंगळे, समीर मन्नान खान आणि समीर संतोष पार्टे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुरुवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला असून अजून दोन पसार इसमाचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: Axis Bank robbery gang arrested