आक्सा बीचवर ४ तरुणांचे प्राण वाचवले !
By Admin | Updated: March 7, 2015 01:39 IST2015-03-07T01:39:28+5:302015-03-07T01:39:28+5:30
आक्सा बीचवर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बुडणाऱ्या चार तरुणांना अग्निशमन दलाच्या जीवरक्षकांनी सुखरूप बाहेर काढले.

आक्सा बीचवर ४ तरुणांचे प्राण वाचवले !
मालाड : आक्सा बीचवर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बुडणाऱ्या चार तरुणांना अग्निशमन दलाच्या जीवरक्षकांनी सुखरूप बाहेर काढले. संचित तिवारी, कमलेश यादव, कीर्ती पाठक, रजनीश ठाकूर अशी त्यांची नावे आहेत.
अंधेरी (पूर्व) येथील पूनम नगरमधील इमारत क्रमांक २२६ मध्ये वास्तव्यास असलेले हे चार तरुण आपल्या मित्रांसोबत येथे आले होते. समुद्रात पोहताना तरुणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि ते ऐन ओहोटीला शंभर मीटर आत पाण्यात बुडू लागले. या घटनेची माहिती मिळताच पालिकेचे समीर कोळी, सचिन मुळीक, मोहन एरंडे, प्रवीण चव्हाण, नथुराम सूर्यवंशी, जयेश कोळी, प्रीतम कोळी, गणपती कोळेकर, निवृत्त जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांच्यासह नागरी सुरक्षा दलाचे विनोद जयस्वाल, चंदन कोळी, राहंल रणदिवे, नंदकुमार मिश्रा यांनी या बुडणाऱ्या तरुणांचे प्राण वाचविले.