Join us  

आकाश कंदीलाच्या माध्यमातून माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाची जागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2020 6:09 PM

Awareness campaign : दिवाळीवर कोरोनाचे सावट

मनोहर कुंभेजकर

मुंबई: यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट आहे. दिवाळी साधेपणाने व फटाकेमुक्त साजरी करा असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. मात्र प्रत्येकाच्या घरात नेहमीप्रमाणे दिवाळी साधेपणाने साजरी करतांना कंदील हे लावले जाणार आहे.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियानाची जनजागृती ही चक्क आता कंदीलातून करण्यात आली आहे. विलेपार्ले विधानसभा मतदार संघातील नागरिकांच्या घरात लावण्यात येणाऱ्या प्रत्येक कंदीलाच्या प्रतिकृतीतून या अभियानाची जागृती करण्यात आली आहे. ओंकार आजविलकर यांनी हे आकर्षक कंदील तयार केले आहे.

विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर  यांच्या संकल्पनेतून खास तयार करण्यात आलेल्या कंदीलातून विलेपार्ल्यातील सुमारे 1000 कुटुंबांना वितरण करण्यात येणार आहे. सदर कंदीलांचा शुभारंभ राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री अँड.अनिल परब यांच्या वांद्रे (पूर्व),गांधीनगर येथील निवासस्थानी करण्यात आले. यावेळी नितीन डिचोलकर,महिला विधानसभा संघटक रूपाली शिंदे शाखा संघटक अपर्णा उतेकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियानाच्या जागृतीमुळे मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण हे 90 टक्के इतके झाले आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव 100 टक्के कमी करण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांनी मास्क लावणे,सोशल डिस्टनसिंग पाळणे आणि हात सतत स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे असे आवाहन अँड.अनिल परब यांनी यावेळी केले.

आमचे कंदील हे पर्यावरणपूरक असून प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर टाळण्यासाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियानाची पार्लेकरांमध्ये जनजागृती करण्यासाठी सुमारे 1000 कंदीलांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती डीचोलकर यांनी दिली. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यादिवाळीलॉकडाऊन अनलॉक