ज्येष्ठ कामगार नेते राजेंद्र भटनागर यांना पुरस्कार

By Admin | Updated: March 18, 2017 04:22 IST2017-03-18T04:22:27+5:302017-03-18T04:22:27+5:30

राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने देण्यात येणारा कामगार महर्षी गं.द. आंबेकर जीवनगौरव पुरस्कार यंदा इंटकचे ज्येष्ठ नेते राजेंद्र भटनागर यांना जाहीर झाला आहे.

Award for Senior Worker Leader Rajendra Bhatnagar | ज्येष्ठ कामगार नेते राजेंद्र भटनागर यांना पुरस्कार

ज्येष्ठ कामगार नेते राजेंद्र भटनागर यांना पुरस्कार

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने देण्यात येणारा कामगार महर्षी गं.द. आंबेकर जीवनगौरव पुरस्कार यंदा इंटकचे ज्येष्ठ नेते राजेंद्र भटनागर यांना जाहीर झाला आहे. त्याशिवाय, राज्यस्तरीय विविध उद्योगांत नेत्रदीपक कार्य करणाऱ्या अन्य पाच नामवंतांनाही आंबेकर श्रमगौरव पुरस्कार प्रदान करण्यात
येईल.
सोमवारी, २० मार्च रोजी दुपारी २.३० वाजता महात्मा गांधी सभागृह, मजदूर मंज़िल, परळ येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल. सोहळ्याला युवक बिरादरीचे संस्थापक संचालक क्रांती शहा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. कामगार चळवळीत राज्यस्तरीय आंबेकर जीवन व श्रमगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
असंघटित घरकाम करणाऱ्या महिलांसाठी लढणाऱ्या मधू बिरमोळे, कसदार लेखणीने सुपरिचित असलेले शासकीय मुद्रणालयातील सेवानिवृत्त कामगार मनोहर धोत्रे, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले कामगार अशोक भोसले, गिरणगावात लोककला संगीतात विशेष लोकप्रिय ठरलेले महादेव खैरमोडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेती गौरी वाडेकर यांना श्रमगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Award for Senior Worker Leader Rajendra Bhatnagar