कोविड काळातील नावीन्यपूर्ण कामासाठी कल्याण डोंबिवलीला पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:06 IST2021-06-26T04:06:25+5:302021-06-26T04:06:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशभरातील शंभर स्मार्ट सिटींमध्ये विविध कामांबद्दल घेण्यात आलेल्या स्पर्धेत कल्याण-डोंबिवलीला कोविड काळात नावीन्यपूर्ण कामाबद्दल ...

Award to Kalyan Dombivali for innovative work during the Kovid period | कोविड काळातील नावीन्यपूर्ण कामासाठी कल्याण डोंबिवलीला पुरस्कार

कोविड काळातील नावीन्यपूर्ण कामासाठी कल्याण डोंबिवलीला पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशभरातील शंभर स्मार्ट सिटींमध्ये विविध कामांबद्दल घेण्यात आलेल्या स्पर्धेत कल्याण-डोंबिवलीला कोविड काळात नावीन्यपूर्ण कामाबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री हरदिप पुरी यांनी शुक्रवारी या पुरस्कारांची घोषणा केली. यात कल्याण-डोंबिवली आणि वाराणसी यांना संयुक्तपणे ‘कोविड इन्होवेशन अवॉर्ड’ घोषित करण्यात आला.

भारत सरकारने २५ ऑगस्ट २०२० रोजी देशभरातील शंभर स्मार्ट सिटींमध्ये विविध संवर्गात स्पर्धांची घोषणा केली होती. स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेडने या स्पर्धेत महापालिकेच्या वतीने ‘कोविड इन्होवेशन अवॉर्ड’ या गटासाठी आपले नामांकन सादर केले होते. यात पहिल्या आणि दुसऱ्या फेरीनंतर एकूण ४० शहरांमधून कोविड इन्होवेशन अवॉर्डसाठी फक्त वाराणसी, कल्याण डोंबिवली , वडोदरा आणि आग्रा या चार शहरांची निवड झाली होती. यात वाराणसी आणि कल्याण - डोंबिवलीला संयुक्त विजेतेपद देण्यात आले.

हा पुरस्कार म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचा सन्मान आहे. कोविड कालावधीत महापालिकेला मदत करणाऱ्या असंख्य डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच अन्य विभागातील अधिकारी - कर्मचारी , अनेक सेवाभावी संस्था, सर्व लोकप्रतिनिधी यांचा हा सन्मान आहे. कमी संसाधनामध्ये महापालिकेने या सगळ्यांच्या सहकार्याने चांगला लढा दिला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.

सांघिक भावनेने संकटाचा मुकाबला करण्याची या शहराने जोपासलेल्या संस्कृतीची केंद्र शासनाने दखल घेतली असून अशीच कार्यपद्धती यापुढेही सुरु राहिल्यास आपण सर्व मिळून खूप प्रगती करु असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Award to Kalyan Dombivali for innovative work during the Kovid period