परेवर रविवारी दुपारपर्यंत लोकल प्रवास टाळा

By Admin | Updated: April 20, 2017 03:16 IST2017-04-20T03:16:30+5:302017-04-20T03:16:30+5:30

हार्बरवर विस्तारीकरणाच्या कामासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून जोगेश्वरी स्थानकात काही कामे हाती घेतली जातील.

Avoid local trains by afternoon, afternoon | परेवर रविवारी दुपारपर्यंत लोकल प्रवास टाळा

परेवर रविवारी दुपारपर्यंत लोकल प्रवास टाळा

मुंबई : हार्बरवर विस्तारीकरणाच्या कामासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून जोगेश्वरी स्थानकात काही कामे हाती घेतली जातील. या कामासाठी पश्चिम रेल्वेवर बारा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हे काम २२ एप्रिल रोजी शनिवारी मध्यरात्री बारा ते रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत चालेल. या कामामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने रविवार दुपारपर्यंत लोकल प्रवास टाळा, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.
जोगेश्वरी स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर धावतील. त्यादरम्यान राम मंदिर स्थानकात लोकल गाड्यांना थांबा देण्यात येणार नाही. मात्र जोगेश्वरी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर लोकल गाड्या थांबतील. तर डहाणू रोड, विरार, वसई, भार्इंदर, बोरीवली, मालाडला जाणाऱ्या जलद लोकल अंधेरी ते बोरीवली दरम्यान फास्ट धावतील. तसेच २३ एप्रिल ते ७ मेपर्यंत सर्व जलद बारा डबा
लोकल गाड्यांना जोगेश्वरी स्थानकात अतिरिक्त थांबा देण्यात येईल.
मात्र डाऊनला जाणाऱ्या सर्व धीम्या लोकल जोगेश्वरी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर थांबतील. त्यांना दोन वेळा थांबा दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Avoid local trains by afternoon, afternoon