Join us  

विमान वाहतूक क्षेत्राचे ३.३ बिलियन डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता; वेतन कपात सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 12:43 AM

मुंबई : देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवरील बंदीमुळे हवाई वाहतूक कंपन्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. भारतीय ...

मुंबई : देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवरील बंदीमुळे हवाई वाहतूक कंपन्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला मार्च ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तब्बल ३.३ ते ३.६ बिलियन डॉलर्सचा फटका बसण्याची भीती सेंटर फॉर एशिया पॅसिफिक सेंटर (सीएपीए) इंडियाने वर्तवली आहे. ३० जूनपर्यंत भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र बंद राहील या अंदाजाने ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मे व जूनमध्ये हवाई वाहतूक सुरू झाली तरी यामध्ये फारसा फरक पडणार नाही असा त्यांचा दावा आहे.हवाई वाहतूक सुरू झाल्यानंतरही प्रवाशांमधील भीतीचे वातावरण कमी होण्यास वेळ लागेल़ हवाई वाहतुकीकडे नियमित प्रमाणात प्रवासी वळण्यास व परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मोठा कालावधी लागेल, असा अंदाज सीएपीएने वर्तवला आहे. याचा फटका केवळ हवाई वाहतूक कंपन्यांना नव्हे, तर त्यासोबत एअरपोर्ट आॅपरेटर, विमानतळावरील विविध ड्युुटी फ्री दुकाने, विमानात व विमानतळावर जेवण, खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या कॅटरिंग कंपन्या, विमानांची देखभाल व दुरुस्ती करणाºया एमआरओ उद्योग अशा विविध घटकांना हा फटका बसणार आहे.भारतातील अनेक विमान कंपन्या यामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर जाण्याची भीती आहे. मात्र विमान जमिनीवर असले तरी त्या विमानांची देखभाल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.विमान जमिनीवर ठेवण्यासाठी शुल्क लागतेविमान जमिनीवर ठेवण्यासाठीदेखील त्यांना आवश्यक शुल्क भरावे लागत आहे. परिणामी प्रवाशांच्या माध्यमातून होणारे उत्पन्न बंद असले तरी त्यांचा नियमित होणारा खर्च मात्र सुरूच आहे. काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास प्रारंभ केला आहे, तर काही कंपन्यांनी कर्मचाºयांना देण्यात येणारे भत्ते व सवलतींबाबत हात आखडता घेतला आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याविमान