अवधूत तटकरे यांचा निसटता विजय
By Admin | Updated: October 20, 2014 02:26 IST2014-10-20T02:26:25+5:302014-10-20T02:26:25+5:30
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अवधूत तटकरे यांच्या निसटत्या विजयाचे वृत्त रोह्यात धडकताच तटकरे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.

अवधूत तटकरे यांचा निसटता विजय
रोहा : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अवधूत तटकरे यांच्या निसटत्या विजयाचे वृत्त रोह्यात धडकताच तटकरे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला. श्रीवर्धन विधानसभा अवधूत तटकरे यांना ६१,०३८ मते मिळाली. तर शिवसेनेचे रवी मुंडे यांना ६०९६१ मते मिळाली आहेत.
शहरात ठिकठिकाणी घोळक्याने नागरिक निकालाबाबत चर्चा आणि प्रतिक्षा करीत होते. या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये खरी लढत होती. मतदानानंतर या पक्षांच्या उमेदवारांनी आपणच निवडून येणार, असे दावे केले होते.
अखेर दुपारी एकच्या सुमारास अवधूत तटकरे हे सुमारे ७७ मतांच्या फरकांनी विजयी झाल्याचे वृत्त धडकले. तटकरे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते या विजयाने आनंदी झाले. (प्रतिनिधी)