‘जे.जे.स्कूल’ला स्वायत्तता
By Admin | Updated: November 9, 2016 06:03 IST2016-11-09T06:03:57+5:302016-11-09T06:03:57+5:30
येथील सर जे.जे.कला महाविद्यालय, सर जे.जे. उपयोजित महाविद्यालय आणि सर जे.जे. वास्तुशास्त्र महाविद्यालय या तिन्ही शासकीय संस्थांना स्वायत्तता देण्याचा निर्णय घेण्यात आला

‘जे.जे.स्कूल’ला स्वायत्तता
मुंबई : येथील सर जे.जे.कला महाविद्यालय, सर जे.जे. उपयोजित महाविद्यालय आणि सर जे.जे. वास्तुशास्त्र महाविद्यालय या तिन्ही शासकीय संस्थांना स्वायत्तता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे कला क्षेत्रात देशात नामांकित असलेल्या या शिक्षण संस्थेला विविध उद्योगांशी समन्वय साधून व्यवसायाभिमुख, रोजगाराभिमुख अभ्यासक्र म सुरू करणे सुलभ होणार आहे.
सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्र मात सुधारणा करण्यासाठी या संस्थांना प्रशासकीय, आर्थिक व शैक्षणकि स्वायत्तता देणे गरजेचे होते. यामुळे संस्थांना विविध उद्योगांशी समन्वय साधून व्यवसायाभिमुख, रोजगाराभिमुख अभ्यासक्र म सुरू करणे सुलभ होईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांना सांगितले. आजच्या निर्णयामुळे या संस्थांसाठी स्वतंत्र नियामक मंडळाची निर्मिती करण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष हे दृश्यकलेतील नामांकित कलाकार किंवा नामांकित कला शिक्षणतज्ज्ञ किंवा नामांकित वास्तुशास्त्रज्ञ किंवा वास्तुशास्त्रातील नामांकित शिक्षणतज्ज्ञ असतील. विविध क्षेत्रातील नामांकित नियामक मंडळावर नेमणूक करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)