पत्नीला घटस्फोट देण्यासाठी लेखकाला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 05:47 IST2018-09-21T05:47:26+5:302018-09-21T05:47:28+5:30

अंधेरीतील एका लेखकाला पत्नीला १२ लाख रुपये देऊन घटस्फोट दे, नाही तर ठार मारेन, अशी धमकी देण्यात आली आहे.

The author threatens to divorce his wife | पत्नीला घटस्फोट देण्यासाठी लेखकाला धमकी

पत्नीला घटस्फोट देण्यासाठी लेखकाला धमकी

मुंबई : अंधेरीतील एका लेखकाला पत्नीला १२ लाख रुपये देऊन घटस्फोट दे, नाही तर ठार मारेन, अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अंधेरी पूर्वेकडील जे.बी. नगर परिसरात २६ वर्षीय तक्रारदार लेखक राहण्यास आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पत्नीसोबत वाद सुरू आहेत. याचदरम्यान अनोळखी क्रमांकावरून सोमवारी दुपारच्या सुमारास आलेल्या फोनने त्यांना धक्का बसला.
फोन करणाऱ्यांनी त्यांना पत्नीसोबत लवकरात लवकर घटस्फोट घे आणि तिला १२ लाख रुपये दे. नाही तर आम्ही तुला ठार मारू, अशी धमकी दिली. सुरुवातीला त्यांनी या धमकीकडे दुर्लक्ष केले. मात्र गुरुवारी पुन्हा धमकीचा फोन आल्याने अखेर त्यांनी याप्रकरणी अंधेरी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
लेखकाने केलेल्या या तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी ३ ते ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला
आहे. मोबाइल क्रमांकावरून या आरोपींचा शोध सुरू असून अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती अंधेरी पोलिसांनी दिली.

Web Title: The author threatens to divorce his wife