न्यायालय परिसरातच आॅडिशन
By Admin | Updated: May 29, 2015 01:12 IST2015-05-29T01:12:57+5:302015-05-29T01:12:57+5:30
दाऊद इब्राहीमचा जवळचा साथीदार मुस्तफा दोसा याने त्याला सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणलेले असताना मॉडेलिंगसाठी मुलींची आॅडिशन टेस्ट घेतल्याची आता उच्च पातळीवरून चौकशी होणार आहे.

न्यायालय परिसरातच आॅडिशन
मुंबई : दाऊद इब्राहीमचा जवळचा साथीदार मुस्तफा दोसा याने त्याला सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणलेले असताना मॉडेलिंगसाठी मुलींची आॅडिशन टेस्ट घेतल्याची आता उच्च पातळीवरून चौकशी होणार आहे. आर्थर रोड तुरुंगातून
सत्र न्यायालयात दोसाला घेऊन येणाऱ्या अधिकारी आणि पोलीस शिपायांना चौकशीला सामोरे जाणे अटळ आहे.
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या खटल्यात दोसा दोषी ठरला आहे. त्याने त्याचा साथीदार खयुमुद्दीन सय्यद याला काही मुलींची आॅडिशन टेस्ट घेण्याची सूचना दिली होती. शिवाय या महिन्याच्या सुरुवातीला सत्र न्यायालयात सुनावणीवेळी त्या मुलींना आणण्यास सांगितले होते. सय्यदने समन्वयक शिवकुमार घोसाळकर याच्याशी संपर्क साधला. त्याने ७-८ मुलींची व्यवस्था केली व त्यांनी दोसाची सत्र न्यायालय परिसरात भेट घेतली. दोसाने त्यापैकी तिघींची निवड करून त्यांना प्रत्येकी एक लाख रूपये करारापोटी देण्यास सांगितले. या मुलींना दुबईला मॉडेलिंग करण्यासाठी पाठविले जाणार होते.
सय्यदने मॉडेलला एक लाख रुपये दिले. सय्यदने पोलीस गणवेशात पाठविलेल्या त्याच्या दोन साथीदारांनी माटुंगा रोडवर मॉडेलला अडविल्यावर ही घटना उघडकीस आली. पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या त्या दोघांनी त्या मॉडेलला ‘‘तुझ्याकडे एवढी मोठी रक्कम कुठून आली,’’ अशी विचारणा केली. तू
ज्या व्यक्तीला भेटली ती व्यक्ती गुन्हेगारी जगातील (अंडरवर्ल्ड
डॉन) असल्याचेही त्यांनी तिला सांगितले. मॉडेलने सय्यदची भेट घेतली. त्याने हस्तक्षेप केला. परंतु तू संकटात सापडली असून आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यामुळे तू ते पैसे या दोघांना देऊन टाक, असे सांगितले. त्यांनी तिचा मोबाईल फोनही ताब्यात घेतला व तो
क्राईम बँ्रचमधून परत घे, असे सांगितले. ती मॉडेल मोबाईल घेण्यासाठी ठाण्यात गेल्यावर काय प्रकार घडला याचा खुलासा पोलिसांना झाला. (प्रतिनिधी)
च्पोलीस महानिरीक्षक (तुरुंग) बी. के. सिंग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,‘‘ आमचे कर्मचारी कैद्यांना त्यांच्या सुनावणीसाठी न्यायालयात संरक्षक म्हणून नसतात. त्यामुळे न्यायालय परिसरात काय घडले याची माहिती फक्त स्थानिक पोलिसांनाच माहिती असेल. बहुतेक वेळा स्थानिक पोलीस आणि कैद्यांना न्यायालयापर्यंत सोबत करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या स्थानिक सशस्त्र पथकालाच त्याची माहिती असेल.’’
च्‘‘हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मी चौकशी सुरू केली. दोसाला न्यायालयापर्यंत सोबत असणाऱ्या पथकाचीही आम्ही चौकशी करू,’’ असे सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती यांनी सांगितले. अतिरिक्त पोलीस आयुक्त कैसर खालीद म्हणाले,‘‘या घटनेत आमचे कोणी कर्मचारी गुंतले होते का हे आम्ही तपासू. जर कोणी दोषी आढळला तर त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाची कारवाई केली जाईल.’’