रसिकांनी नाटकाकडे पाठ फिरवू नये
By Admin | Updated: August 5, 2014 01:00 IST2014-08-05T01:00:49+5:302014-08-05T01:00:49+5:30
टीव्ही ही अत्यंत स्वस्त करमणूक आहे. ती अनुभवताना फारसे डोके चालवायची गरज नसते. रंगभूमीचा जो काही आसमंत आहे,

रसिकांनी नाटकाकडे पाठ फिरवू नये
मुंबई : टीव्ही ही अत्यंत स्वस्त करमणूक आहे. ती अनुभवताना फारसे डोके चालवायची गरज नसते. रंगभूमीचा जो काही आसमंत आहे, तो म्हणजे प्रत्येक नटांसाठी शाळा आहे. प्रत्येक नटाने थिएटर करणो आवश्यक आहे. कुठलाही नट केवळ नाटक करून श्रीमंत होत नाही, पण रंगभूमीवर काम करून तो बुद्धीने व ज्ञानाने श्रीमंत होत असतो. मराठी नाटक जिवंत राहण्यासाठी ही मंडळी रंगभूमीवर काम करत आहेत. रसिकांनीही टीव्हीच्या अधीन होऊन मराठी नाटकाकडे पाठ फिरवू नये, असे भाष्य ज्येष्ठ अभिनेते विक्र म गोखले यांनी केले. घोळात घोळ’ या नाटकाच्या 1क्क् व्या प्रयोगाचे औचित्य साधून कलावंतांतर्फे देण्यात आलेला एक लाखाचा निधी शिवाजी मंदिरात त्यांच्या हस्ते आनंदवनला प्रदान करण्यात आला. आनंदवनच्या वतीने भारती आमटे यांनी त्याचा स्वीकार केला.
घोळात घोळ या नाटकाच्या मूळ संचात भूमिका साकारणारे विक्र म गोखले या नाटकाच्या आठवणी जागवताना म्हणाले, आज मला आमची 4क् वर्षापूर्वीची तालीम आठवली. मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, बबन प्रभू यांच्याकडून मी हे नाटक लिहून घेतले होते. अरविंद देशपांडे, भावना, अरु ण जोगळेकर, सुषमा तेंडुलकर अशा कलाकारांनी मिळून आम्ही हे नाटक 1977 मध्ये केले होते. आज मला माङया त्या सगळ्या सवंगडय़ांची आठवण होत आहे. नाटकांतून रडवणो सोपे आहे, पण खळखळून हसवणो कठीण आहे. आज समाजात एकूणच जे काही दिसतेय किंवा सर्वावर जी वेळ आली आहे, त्यावर हसण्यासारखे दुसरे कुठलेही औषध नाही. तरु ण कलाकारांची पिढी रसिकांना हसवण्याचे काम करत आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. तरु ण पिढीबद्दल मला प्रेम आणि आत्मीयता आहे.
या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे व आनंदवनचे विकास आमटे व्यासपीठावर उपस्थित होते. या नाटकाच्या 1क्क् व्या प्रयोगाचे सर्व उत्पन्न या वेळी आनंदवनला देण्यात आले. त्याचा स्वीकार करताना भारती आमटे म्हणाल्या, आनंदवनात सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण करण्याचे काम पु.ल. देशपांडे यांनी केले होते. 1975 मध्ये त्यांनी ती फुलराणी’ हे त्यांचे नाटक आनंदवनात सादर केले होते. तिथून हा गुंजारव तिथे पुढे कायम होत राहिला. घोळात घोळ या नाटकाचा प्रयोग संजय नार्वेकर यांनी आमच्या अंध-अपंग, कुष्ठरोग बांधवांसाठी यापूर्वी आनंदवनात सादर केला होता. आज या नाटकाच्या कलावंतांनी आनंदवनला निधी देण्याचे ठरवले, ही स्पृहणीय व अनुकरणीय गोष्ट आहे. कलावंतांची यामागची भावना आम्ही आमच्या बांधवांर्पयत नक्की पोहोचवू. (प्रतिनिधी)