Join us

कर्जबुडव्या नीरव मोदीच्या मालमत्तेचा आज लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 07:06 IST

पहिल्या टप्प्यात ४० वस्तूंचा समावेश असून त्यात १५ मौल्यवान कलाकृती आहेत.

मुंबई : विविध बॅँकांना हजारो कोटींचा गंडा घालून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या जप्त केलेल्या मालमत्तेपैकी ११२ मौल्यवान वस्तूंचा लिलाव गुरुवारपासून केला जाईल. पहिल्या टप्प्यात ४० वस्तूंचा समावेश असून त्यात १५ मौल्यवान कलाकृती आहेत.बॅँकांचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या नीरव मोदीची मुंबईसह देशभरातील विविध कार्यालये व मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली आहेत. या संपत्तीचा लिलाव करून थकबाकी वसूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोदीकडे एम. एफ. हुसेन यांच्यासह देश व परदेशातील प्रसिद्ध कलाकारांच्या चित्रकृती, महागडी घड्याळे, मोटारी आदींचा समावेश आहे. त्याची किंमत जवळपास २०० कोटींच्या घरात आहे. पहिल्या टप्प्यात विविध किमती कलाकृतींवर बोली लावली जाईल. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात अन्य वस्तूंचा लिलाव केला जाईल.

टॅग्स :नीरव मोदी