अबब....४२५ कोटींना विकला गेला मुंबईतील बंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2015 10:19 IST2015-09-08T10:19:10+5:302015-09-08T10:19:24+5:30
मुंबईतील मलबार हिल येथील जाटिया हाऊस हा बंगला ख्यातनाम उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांनी तब्बल तब्बल ४२५ कोटी रुपयांना विकत घेतला आहे.

अबब....४२५ कोटींना विकला गेला मुंबईतील बंगला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - मुंबईतील मलबार हिल येथील जाटिया हाऊस हा बंगला ख्यातनाम उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांनी तब्बल तब्बल ४२५ कोटी रुपयांना विकत घेतला आहे. ३० हजार चौरस फुटाच्या जागेवर वसलेला हा बंगला मुंबईतील सर्वात महागडा बंगला ठरला आहे.
मलबार हिलमधील जाटिया हाऊस हा बंगला दुमजली असून १९५० मध्ये हा बंगला बांधण्यात आला होता. जाटिया बंधू गेल्या दोन वर्षांपासून हा बंगला विकण्याचा प्रयत्न करत होते. अलिशान जाटिया हाऊस विकत घेण्यासाठी कुमारमंगलम बिर्ला व अन्य दोन उद्योजकही या बंगल्यासाठी स्पर्धेत उतरले होते. मात्र कुमार मंगलम बिर्ला यांनी बंगल्यासाठी तब्बल ४२५ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली व शेवटी हा बंगला त्यांनाच विकण्यात आला. या बंगल्याचा पुनर्विकास करण्याचा बिर्ला यांचा कोणताही विचार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.