माथेरानच्या पर्यटकांना लाकडी वस्तूंचे आकर्षण

By Admin | Updated: May 21, 2014 04:54 IST2014-05-21T04:54:07+5:302014-05-21T04:54:07+5:30

पर्यटनस्थळी गेल्यावर कोणतीही व्यक्ती नवीन वस्तू, खाद्य आदींच्या शोधात असते.

The attraction of wooden objects to Matheran tourists | माथेरानच्या पर्यटकांना लाकडी वस्तूंचे आकर्षण

माथेरानच्या पर्यटकांना लाकडी वस्तूंचे आकर्षण

कर्जत : पर्यटनस्थळी गेल्यावर कोणतीही व्यक्ती नवीन वस्तू, खाद्य आदींच्या शोधात असते. अशाच प्रकारे माथेरानमध्ये सध्या लाकडी वस्तूंची मागणी वाढत आहे. मूळचे हरिद्वार येथील एका व्यापार्‍याने लाकडी वस्तूंना गेल्या दहा वर्षांपासून माथेरानमध्ये मोठी बाजारपेठ मिळवून दिली आहे. माथेरानमध्ये येणारे पर्यटक पूर्वी येथील लाल मातीचे रस्ते, घोडे, निसर्गाचे वरदान लाभलेली वनराई आणि येथील चर्मोद्योग यामध्ये माथेरानला पर्यटक गुरफटत होता. पुढे माथेरानच्या स्थानिक लोकांनी मोठ्या प्रमाणात नवनवीन वस्तू बाजारात आणून पर्यटकांना अनेक पर्याय खरेदीमध्ये उपलब्ध करून दिले. त्यात आदिवासी महिलांनी जंगलातील गवताला विविध रंग देवून त्यात चांगले मार्केटिंग केले. त्यामुळे माथेरानमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक लाकडी वस्तू खरेदी करताना दिसतात. (वार्ताहर)

Web Title: The attraction of wooden objects to Matheran tourists