नगरसेवकांचे लागले निकालाकडे लक्ष
By Admin | Updated: October 19, 2014 00:55 IST2014-10-19T00:55:16+5:302014-10-19T00:55:16+5:30
युती-आघाडीच्या ताटातुटीने बहुसंख्य नगरसेवकांना उमेदवारी मिळाली.

नगरसेवकांचे लागले निकालाकडे लक्ष
मुंबई : युती-आघाडीच्या ताटातुटीने बहुसंख्य नगरसेवकांना उमेदवारी मिळाली. तर महिला आरक्षणामुळे स्पर्धेतून बाद झालेल्या माजी नगरसेवकांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची संधी मिळाली आहे. या लढतीत कोणाचे नशीब फळफळतेय याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही लढती प्रतिष्ठेच्या असल्याने अशा नगरसेवकांचा जीव टांगणीला लागलेला आहे.
शिवसेना आणि भाजपा व काँग्रेस आणि राष्ट्रवादी या उभय पक्षांमधील युती तुटल्याचा फायदा नगरसेवकांना झाला आहे. पूर्वी मित्रपक्षासाठी सोडाव्या लागणा:या जागा युती तुटल्यामुळे रिकाम्या झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी ज्येष्ठ नगरसेवकांना उमेदवारी दिली. या संधीचे सोने करण्यासाठी नगरसेवकांनीही जीव ओतून प्रचार केला. त्याचबरोबर माजी नगरसेवकांनीही पुनरागमनाची जोरदार तयारी केली आहे.
या वेळेस शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे असे पाच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असल्याने आपल्या यशाची शाश्वती कोणत्याच उमेदवाराला नाही. निवडणुकीत पराभव झाला तरी नगरसेवकपद कायम राहणार आहे. परंतु पक्षाने दाखविलेली मर्जी धोक्यात येईल, अशी भीती अनेकांना वाटते आहे. तर माजी नगरसेवकांसाठी ही संधी अखेरची ठरण्याची शक्यता असल्याने अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
या नगरसेवकांचे भवितव्य पणाला
काँग्रेस : प्रवीण छेडा, शीतल म्हात्रे, मनोज जामसूतकर, काँग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढविणारे सुरेश कोपरकऱ
राष्ट्रवादी : हरुन खान, राखी जाधव, नंदकुमार वैती.
शिवसेना : सुनील प्रभू, अशोक पाटील, अरुण दुधवडकऱ
मनसे : दिलीप लांडे, ईश्वर तायडे, भालचंद्र आंबुरे, डॉ़ शुभा राऊळ, दीपक पवार.
भाजपा : मनोज कोटक, अमित साटम, मनीषा चौधरी, डॉ़ राम बारोट, उज्जवला मोडक, महेश पारकर, विठ्ठल खरटमोल़
अपक्ष : सिरील डिसोजा.
यांना पुनरागमनाची आशा
काँग्रेस : राजेश शर्मा, राजेंद्र माहुलकर.
भाजपा : विद्या ठाकूर, पराग अळवणी.
शिवसेना : संजय पोतनीस, प्रकाश फातर्पेकर, सुधीर मोरे, तुकाराम काते, प्रभाकर शिंदे, शुभदा गुडेकर, जयवंत परब, रमेश लटके, शशिकांत पाटकर, हेमंत डोके, मंगेश सातमकर, विलास चावरी.
राष्ट्रवादी : अजित रावराणो, नरेंद्र वर्मा, शरद शिवकुमार पवार, राजेंद्र वाघमारे, रवींद्र पवार, कप्तान मलिक.
मनसे - स्नेहल जाधव, विजय कुडतरकऱ (प्रतिनिधी)
दहिसर : शीतल म्हात्रे (काँग्रेस), मनीषा चौधरी (भाजपा), डॉ़ शुभा राऊळ (मनसे) या तिन्ही नगरसेविकांनी विद्यमान आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत़
भांडुप : मनोज कोटक (भाजपा) अशोक पाटील (शिवसेना)़
जोगेश्वरी पूर्व : उज्जवला मोडक (भाजपा), भालचंद्र आंबुरे (मनसे)़
मालाड : डॉ़ राम बारोट (भाजपा), दीपक पवार (मनसे),
सिरील डिसोजा (अपक्ष).
घाटकोपर पू.: प्रवीण छेडा (काँग्रेस), राखी जाधव (राष्ट्रवादी)़
घाटकोपर पश्चिम : हारून खान (राष्ट्रवादी), दिलीप लांडे (मनसे)