तरुणींसोबत अश्लील चाळे करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2016 04:21 IST2016-02-25T04:21:07+5:302016-02-25T04:21:07+5:30

सीएसटीलगत असलेल्या नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मोहम्मद शेख (२०) या विकृत युवकाच्या आझाद मैदान पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

Attendees who have sex with the girls | तरुणींसोबत अश्लील चाळे करणारा अटकेत

तरुणींसोबत अश्लील चाळे करणारा अटकेत

मुंबई : सीएसटीलगत असलेल्या नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मोहम्मद शेख (२०) या विकृत युवकाच्या आझाद मैदान पोलिसांनी मुसक्या आवळल्या. विशेष म्हणजे विद्यार्थिनीच्या मदतीने तिच्या पालकाने त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता. आरोपी अभिलेखावरील गुन्हेगार आहे.
विठ्ठलवाडी येथील रहिवासी असलेल्या शेखवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विचित्र वागणुकीमुळे आईने त्याला बेदम चोप देत घराबाहेर काढले होते. त्यानंतर शेखने मेट्रो थिएटरकडे जाणाऱ्या सबवेमध्ये स्वत:चे बस्तान मांडले. एखादी तरुणी सबवेमधून एकटी जाताना दिसली, की तो तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. काही दिवसांनंतर याच महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीने घडलेला प्रकार आईच्या कानावर घातला.
विद्यार्थिनीच्या आईने ४ दिवस त्याच्यावर वॉच ठेवला. मुलीला सबवेमधून एकटे पाठवून ती मागे थांबत असे. खात्री पटताच महिलेने याबाबत आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर त्या स्वत: सबवेमध्ये उतरल्या. शेख त्यांच्यासोबत अश्लील चाळे करणार तोच त्यांनी पोलिसांना इशारा केला आणि त्याला अटक करण्यात आली.

Web Title: Attendees who have sex with the girls