रॉकेलचा काळाबाजार करणारा अटकेत
By Admin | Updated: August 20, 2015 23:56 IST2015-08-20T23:56:24+5:302015-08-20T23:56:24+5:30
गोरगरीब नागरिकांसाठी असलेले रेशनचे रॉकेल काळ्याबाजारात विकणाऱ्या दुकानदाराला आरसीएफ पोलिसांनी अटक केली. पवनकुमार अग्रवाल असे या आरोपीचे

रॉकेलचा काळाबाजार करणारा अटकेत
मुंबई : गोरगरीब नागरिकांसाठी असलेले रेशनचे रॉकेल काळ्याबाजारात विकणाऱ्या दुकानदाराला आरसीएफ पोलिसांनी अटक केली. पवनकुमार अग्रवाल असे या आरोपीचे नाव असून अशा प्रकारे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चेंबूरच्या वाशी नाका परिसरात आरोपीचे रेशनचे दुकान असून या दुकानातून तो रॉकेलची काळ्याबाजारात विक्री करत होता. मंगळवारी हा आरोपी काही कामगारांच्या मदतीने रॉकेलने भरलेले कॅन टॅक्सीत भरत होता. ही बाब रहिवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ आरसीएफ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी या आरोपीला टॅक्सीत रॉकेलचे कॅन भरताना रंगेहाथ अटक केली. तर त्याचा एक साथीदार टॅक्सी घेऊन पळून गेला. पोलिसांनी ही टॅक्सी अडवण्याचा प्रयत्न केला असता टॅक्सीचालकाने एका पोलीस शिपायाच्या अंगावर टॅक्सी घालण्याचा प्रयत्न केला. या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.