पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST2021-02-05T04:28:50+5:302021-02-05T04:28:50+5:30

मुंबई : पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना घाटकोपरमध्ये भीमनगर परिसरात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. यात प्रमोद आगोडे ...

Attempted murder of a young man out of prejudice | पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न

पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न

मुंबई : पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना घाटकोपरमध्ये भीमनगर परिसरात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. यात प्रमोद आगोडे (२३) हा तरुण जखमी झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

.................................

भायखळ्यात महिलेला एमडीसह अटक

मुंबई : माझगाव येथे राहणाऱ्या राबिया शेख हिच्याकडून पाेलिसांनी साेमवारी दोन लाख किमतीचा ६७ ग्रॅम एमडी जप्त केला. भायखळा येथील नाथ पै रोडवर ही कारवाई करण्यात आली. याबाबत भायखळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

............................

हद्दपार केलेल्या आरोपीला शस्त्रासह अटक

मुंबई : हद्दपार केलेल्या मोहम्मद इमरान अश्रफ अन्सारी ऊर्फ ललवा (२४) याला मंगळवारी शस्त्रासह अटक करण्यात आली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून ललवाची अधिक चाैकशी सुरू आहे.

..........................

Web Title: Attempted murder of a young man out of prejudice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.