शिवाजीनगरात किरकोळ वादातून हत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:17 IST2020-11-22T09:17:14+5:302020-11-22T09:17:14+5:30
मुंबई : शिवाजीनगरचे रहिवासी नावेद शेख (२९) मित्र आसिफ, पप्पू आणि रिझवानसोबत बोलत उभे असताना, त्रिकूटाने आसिफवर हल्ला केला. ...

शिवाजीनगरात किरकोळ वादातून हत्येचा प्रयत्न
मुंबई : शिवाजीनगरचे रहिवासी नावेद शेख (२९) मित्र आसिफ, पप्पू आणि रिझवानसोबत बोलत उभे असताना, त्रिकूटाने आसिफवर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. घरगुती भांडणात मध्यस्थी केल्याच्या किरकाेळ वादातून हल्ला करणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. पसार साथीदाराचा शोध सुरू आहे.
....................................
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २९४ कोरोनाबाधितांवर कारवाई
मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांंसाठी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करून फिरणाऱ्या २९४ रुग्णांंविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी २० मार्च ते १९ नोव्हेंबरपर्यंत ही कारवाई केली.
............................