मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून लुटणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 02:10 IST2016-09-02T02:10:05+5:302016-09-02T02:10:05+5:30
मंत्रालयामध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून तब्बल १५० तरुणांना २६ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्यास भायखळा पोलिसांनी गजाआड केले आहे. किरण चालू मनगुटे असे

मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून लुटणारा अटकेत
मुंबई : मंत्रालयामध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून तब्बल १५० तरुणांना २६ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्यास भायखळा पोलिसांनी गजाआड केले आहे. किरण चालू मनगुटे असे आरोपीचे नाव आहे. मनगुटे तरुणांना १८ ते २० हजार रुपये मासिक वेतनावर मंत्रालयामध्ये सरकारी नोकरीस ठेवण्याचे आमिष दाखवून पैसे उकळून पळ काढत होता. फसवणूक झालेल्या रामप्रकाश माने याने तक्रार दिली. त्यावरून तपास करत असलेल्या भायखळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने मनगुटेला अटक केली. (प्रतिनिधी)