Join us

ऑर्केस्ट्रामध्ये जुने गाणे लावले म्हणून मॅनेजरच्या हत्येचा प्रयत्त्न

By मनीषा म्हात्रे | Updated: December 10, 2023 18:54 IST

सहा जणांनी लाथाबुक्क्यांसह मारहाण केली. यातून काहींनी चाकूने वार केले.

मुंबई: ऑर्केस्ट्रामध्ये जुने गाणे लावले म्हणून त्रिकुटाने थेट मॅनेजरच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी डी.  बी मार्ग पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्हयात तिघांना अटक केली आहे. मोहम्मद सिद्दीकी हुसेन शेख (५१), सबी हसन उर्फ बिल्ली (५४) आणि युसूफ शेख (५२) अशी अटक आरोपींची नावे आहे.

हॉटेल मॅनेजर अमरजित सिंग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत कारवाई केली आहे. या हल्ल्यात जखमी झालेले मॅनेजर नितीश रॉयवर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहे. शुक्रवारी रात्री उशिराने हे सहा जण हॉटेलमध्ये आले. तेव्हा रॉय कर्तव्यावर होते. जुलै २०२३ मध्ये ऑर्केस्ट्रामध्ये जुने गाणे लावल्यावरून त्यांचे रॉयसोबत खटके उडाले होते. शुक्रवारी रात्री उशिराने याच रागातून त्यांनी, रॉय यांना मारहाण केली.

त्यांना सहा जणांनी लाथाबुक्क्यांसह मारहाण केली. यातून काहींनी चाकूने वार केले. या घटनेने रेस्टोरंटमध्ये खळबळ उडाली. या हल्यात रॉय गंभीर जखमी असून त्यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरु आहे. सिंग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहा जणाविरुद्ध गुन्हा नोंदवत तिघांना अटक केली. या गुन्ह्यातील शानू, गोऱ्या आणि शाहीन भाई यांचा शोध सुरु आहे.  

 

 

 

 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी