लोकोपयोगी योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील

By Admin | Updated: December 8, 2014 22:40 IST2014-12-08T22:40:09+5:302014-12-08T22:40:09+5:30

जनतेच्या विकासासाठी आवश्यक योजना कोकणला मिळवून देण्यासाठी कायम कटिबध्द असून त्यासाठी सदैव प्रय}शील असल्याचे प्रतिपादन अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केले.

Attempt to implement a utility plan | लोकोपयोगी योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील

लोकोपयोगी योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील

गोरेगाव : जनतेच्या विकासासाठी आवश्यक  योजना कोकणला मिळवून देण्यासाठी कायम कटिबध्द असून त्यासाठी सदैव प्रय}शील असल्याचे प्रतिपादन अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेमधून मंजूर झालेल्या लोणोरे ते पन्हाळघर रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच लोणोरे येथील विजय राईस मिलच्या भव्य पटांगणात पार पडले. यावेळी ते बोलत होते. 
गीते म्हणाले, केंद्र सरकारच्या तीन महत्त्वाच्या योजना आहेत, त्यात पंतप्रधान  ग्रामसडक योजना, राष्ट्रीय पेयजल योजना व सर्वशक्तीय अभियान योजनेचा समावेश आहे. पंतप्रधान गामसडक योजनेमधून नवीन रस्ते व रस्त्यांचे नूतनीकरण केले जाते. मात्न आघाडी सरकारने महाराष्ट्रातील सर्व रस्ते जोडून झाले असल्याचे व ते उत्तम असल्याचे लेखी पत्न केंद्र सरकारला दिल्याने नवीन योजनेच्या अंदाजपत्नकामधे महाराष्ट्रासाठी एकही रूपयाचा निधी  मिळालेला नाही. त्यामुळे या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी संघर्ष करून निधी आणलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये रायगडचे 58 किमीचे रस्ते मंजूर केले आहेत. यापुढील नवीन रस्त्यांसाठी निधीसाठीही प्रय} करणार असल्याचे गीते यांनी सांगितले. 
यावेळी आमदार भरत गोगावले, डॉ.आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू राजू माणकर, लोणोरे ग्रामपंचायत सरपंच प्रभाकर ढेपे, युवा नेते शिवाजी टेंबे, राजू साबळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील,  महिला संघटक स्वप्नाली शिंदे, नीलिमा घोसलकर आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)

 

Web Title: Attempt to implement a utility plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.