तरुणावर पेव्हरब्लॉकने हल्ला; घरासमोर मोटरसायकल पार्क केल्याचा राग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:05 IST2021-06-30T04:05:55+5:302021-06-30T04:05:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घरासमोर मोटारसायकल पार्क केल्याच्या रागात एका तरुणावर कुटुंबीयाने पेव्हरब्लॉकने हल्ला केला. याची तक्रार मालवणी ...

Attack on youth with paverblock; Anger at parking a motorcycle in front of the house | तरुणावर पेव्हरब्लॉकने हल्ला; घरासमोर मोटरसायकल पार्क केल्याचा राग

तरुणावर पेव्हरब्लॉकने हल्ला; घरासमोर मोटरसायकल पार्क केल्याचा राग

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घरासमोर मोटारसायकल पार्क केल्याच्या रागात एका तरुणावर कुटुंबीयाने पेव्हरब्लॉकने हल्ला केला. याची तक्रार मालवणी पोलीस ठाण्यात सोमवारी करण्यात आली असून, अल्पवयीन मुलीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मालवणीत अली तलावापुढे असलेल्या शंकर मंदिरजवळ हा प्रकार घडला. यातील जखमी तरुण रमेश अलकुंटे (३६) हा २८ जून, २०२१ रोजी त्याच्या आईसोबत संध्याकाळी सहाच्या सुमारास चिकन आणण्यासाठी गेला होता. परतल्यावर त्याने त्याची मोटारसायकल त्याच्या घरासमोर पार्क केली. तेव्हा त्याच्या गाडीचा फोटो काढणाऱ्या इटकर याला रमेशने जाब विचारला. त्यावर माझ्या जागेवर गाडी का पार्क केली, अशी विचारणा करत इटकरने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इटकरचा मुलगा सुमित हा रमेशला मारहाण करू लागला, तर त्याच्या १३ वर्षीय मुलीने रमेशच्या डोळ्यात मसाला फेकला. इतकेच नव्हे तर रमेशची आई कोलामा (७०) यांना इटकरचा भाऊ आनंदने मारहाण केली. रमेशचा पुतण्या रोहितलाही आनंदने पेव्हरब्लॉकने जखमी केले. या घटनेचा व्हिडिओ ‘लोकमत’कडे आला आहे. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

फोटो ओळ : तरुणावर मसाला भिरकवताना.

....................................................................

Web Title: Attack on youth with paverblock; Anger at parking a motorcycle in front of the house