लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सगळीकडे होळीचा उत्सव सुरू असतानाच राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी मुंबईतील कुर्ला, शिवाजीनगर आणि गोवंडीत छापेमारी करत केलेल्या धडक कारवाईने खळबळ उडाली आहे. कारवाईत तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे तरुण बंदी घातलेल्या पाक पुरस्कृत विविध दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत मोबाईल फोन, लॅपटॉपसह अनेक डिजिटल पुरावे जप्त करत त्यांची सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे.
ऑनलाइन माध्यमातून पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या प्रमुखांशी संपर्क तसेच संघटनेची भूमिका आणि प्रचार साहित्याचा ऑनलाइन प्रसार या माध्यमातून तरुणांची माथी भडकवण्याचा आणि संघटनेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होत असल्याची गोपनीय माहिती एसटीएसला मिळाली. या माहितीआधारे सोमवारी संध्याकाळी कुर्ला, शिवाजीनगर व गोवंडी परिसरातील संशयितच्या घरात एकाच वेळी छापे घालण्यात आले. या कारवाईत ३ ते चार संशयितांच्या घराची झडती घेतली. ही कारवाई सोमवारी रात्री संध्याकाळी सुरू झाली. मध्यरात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. छाप्यांमध्ये मोबाईल फोन आणि लॅपटॉपसह असंख्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली असून, अनेकांची चौकशी करण्यात येत आहे.
त्या उपकरणांच्या डेटाची होणार तपासणी प्राथमिक तपासात हे तरुण पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच डिजिटल माध्यमांतून तरुणांना प्रभावित करण्याचा किंवा भरती करण्याचा प्रयत्न झाला होता का? याचाही तपास सुरू आहे. या कारवाईत काळाचौकी, नागपाडा आणि विक्रोळी येथील एटीएस पथकांनी संयुक्तरीत्या सहभाग घेतला. सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या छापेमारीनंतर पुढील तपासाच्या आधारे शहरातील इतर भागांतही कारवाई होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, जप्त केलेल्या उपकरणांमधील डेटा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
Web Summary : Mumbai ATS raided Kurla, Shivaji Nagar, and Govandi, detaining three youths suspected of ties to Pakistan-backed terrorist groups. Mobile phones and laptops were seized for investigation. The youths are believed to have been radicalized online. Further investigation is underway.
Web Summary : मुंबई एटीएस ने कुर्ला, शिवाजी नगर और गोवंडी में छापा मारा, पाकिस्तान समर्थित आतंकवादी समूहों से संबंध रखने के संदेह में तीन युवकों को हिरासत में लिया। जांच के लिए मोबाइल फोन और लैपटॉप जब्त किए गए। माना जा रहा है कि युवकों को ऑनलाइन कट्टरपंथी बनाया गया था। आगे की जांच जारी है।