Join us  

Mansukh Hiren Case: तीन दिवस झाले तरी...; एनआयएनं कोर्टात दिली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 10:57 PM

ats have not transferred Mansukh Hiren Case even after Three days nia in court: केंद्र आणि राज्याच्या तपास यंत्रणा आमनेसामने; मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास अद्याप एनआयएकडे नाही

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे. तीनच दिवसांपूर्वी गृह मंत्रालयानं व्यवसायिक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपासदेखील एनआयएकडे सोपवला. या प्रकरणाबद्दल एनआयएनं न्यायालयात धक्कादायक माहिती दिली आहे. मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणासह मनसुख हिरेन प्रकरणात केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू आहे. त्यात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे. (ats have not transferred Mansukh Hiren Case even after Three days nia in court)केंद्रीय गृह मंत्रालयानं मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास हाती घेण्याची सूचना करून तीन दिवस उलटले आहेत. मात्र तीन दिवसानंतरही महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं (एटीएस) आमच्या हाती तपास सोपवलेला नाही. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसनं हस्तांतरित केलेला नाही, अशी माहिती एनआयएनं स्पेशल एनआयए कोर्टाला दिली आहे. एटीएसनं तपासातले पुरावे अद्याप आपल्याकडे सोपवले नसल्याचा दावा एनआयएनं केला आहे.मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास हाती घेण्याच्या सूचना केंद्रीय गृह मंत्रालयानं २० मार्चला एनआयएला दिल्या. त्याआधी एटीएस या प्रकरणाचा तपास करत होतं. मात्र एटीएसनं अद्याप या प्रकरणातले पुरावे, कागदपत्रं आपल्याला दिलीच नसल्याचा एटीएसचा दावा आहे. यामुळे एटीएसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास एनआयएनं आधीच सुरू केला आहे. ही कार हिरेन यांच्या मालकीची होती. अंबानींच्या घराजवळ कार आढळून आल्यानंतर काही दिवसांत हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. ही दोन्ही प्रकरण एकमेकांशी संबंधित असल्यानं गृह मंत्रालयानं एनआयएला स्फोटक प्रकरणापाठोपाठ हिरेन प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :मनसुख हिरणमुकेश अंबानीराष्ट्रीय तपास यंत्रणाएटीएस