Join us  

एटीएममध्ये तरुणीसोबत अश्लील वर्तन; व्हिडीओ ट्विट केल्यावर ठाण्यातील तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 4:49 AM

लुंडच्या एटीएम सेंटरमधून पैसे काढत असताना, तरुणीला अडचण निर्माण होत होती. त्याच दरम्यान तेथे आलेल्या तरुणाने तिला मदत करू का, असे विचारले.

मुंबई : मुलुंडच्या एटीएम सेंटरमधून पैसे काढत असताना, तरुणीला अडचण निर्माण होत होती. त्याच दरम्यान तेथे आलेल्या तरुणाने तिला मदत करू का, असे विचारले. तिने नकार दिल्याच्या रागात, तरुणाने तिला अश्लील स्पर्श केला. पुढे पैसे काढतेवेळी तिच्यासमोर विकृत चाळे केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. तरुणीनेही न घाबरता मोबाइलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण सुरू करताच तरुणाने पळ काढला. तरुणीने हा व्हिडीओ टिष्ट्वट केल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच विकृत संदीप कुंभारकर (३८) याला अटक केली आहे.मुलुंड पूर्वेकडील हरिओमनगर परिसरात २३ वर्षीय तक्रारदार तरुणी कुटुंबीयांसोबत राहते. रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ती जवळील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आली होती. त्याच दरम्यान, पैसे येत नसल्याने ती वैतागली. हे पाहून पैसे काढण्यासाठी आलेल्या संदीपने तिला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, अनोळखी व्यक्तीकडून मदत घेणे चुकीचे असल्याने तिने नकार दिला. त्याच दरम्यान, संदीपने तिला अश्लील स्पर्श करत धक्का दिला. पुढे, एटीएममधून पैसे काढू लागला. तरुणीने त्याला याचा जाब विचारताच, त्याने एटीएममध्ये कोणीही नसल्याचे पाहून तिच्यासमोर विकृत चाळे करण्यास सुरुवात केली. याचे तिने मोबाइलमध्ये चित्रण करण्यास सुरुवात करताच संदीपने पळ काढला. या प्रकारानंतर तरुणीने हा व्हिडीओ टिष्ट्वट केला. याची दखल घेत, नवघर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत, त्यांनी व्हिडीओच्या आधारे ठाणे येथून संदीपला अटक केली. संदीप हा उच्चशिक्षित असून कोपरी परिसरात राहतो. तो चांगल्या कंपनीत नोकरीला आहे.

टॅग्स :गुन्हेगारी