मुंबई : सोमवारी आणि मंगळवारी मुंबई शहर आणि उपनगरातील आकाश अंशत: ढगाळ नोंदविण्यात आले असतानाच बुधवारसह गुरुवारीदेखील मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ नोंदविण्यात येईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. येथील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २१ अंशाच्या आसपास राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली असून, मंगळवारी मुंबईचे किमान तापमान २१.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.५ आणि ६ डिसेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ७ डिसेंबरला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईतील वातावरण ढगाळ राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 06:14 IST