एटीएमचे कुलूप तोडणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:06 IST2021-04-01T04:06:32+5:302021-04-01T04:06:32+5:30
मुंबई : सांताक्रूझ (पू.) येथील एटीएमचे कुलूप तोडणाऱ्या व्यक्तीला वाकोला पोलिसांनी अटक केली. आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीलाही आरोपीने ...

एटीएमचे कुलूप तोडणाऱ्याला अटक
मुंबई : सांताक्रूझ (पू.) येथील एटीएमचे कुलूप तोडणाऱ्या व्यक्तीला वाकोला पोलिसांनी अटक केली. आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीलाही आरोपीने चाकूने हल्ला करण्याची भीती दाखविली हाेती. ही बाब पोलिसांच्या नजरेत आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
..........................................
‘पॉक्सो’च्या गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा
मुंबई : आझाद मैदान पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या पॉक्सोच्या गुन्ह्यातील आरोपीला ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत १० वर्षे तुरुंगवास आणि १०,००० दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. याचा तपास करणाऱ्या पोलिसांचा मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सत्कार केला.
................................
विनामास्क फिरणाऱ्यांना मास्कचे वाटप
मुंबई : विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. दंड आकारण्यासाेबतच काही ठिकाणी पोलिसांकडून विनामास्क फिरणाऱ्यांना मास्कचेही वाटप करण्यात येत आहे. काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने मास्क अवश्य वापरा, असे आवाहनही पाेलिसांकडून करण्यात येत आहे.
.............................................