एटीएम कार्डधारक धास्तावले
By Admin | Updated: August 9, 2014 00:01 IST2014-08-09T00:01:58+5:302014-08-09T00:01:58+5:30
बँक एटीएम कार्डधारकांना फोन करुन बँक मॅनेजर, एटीएम कार्ड अधिकारी बोलतोय असे सांगून त्यांच्या बँक खात्याची व एटीएम कार्डची माहिती मोठय़ा शिताफीने काढून

एटीएम कार्डधारक धास्तावले
>जयंत धुळप ल्ल अलिबाग
बँक एटीएम कार्डधारकांना फोन करुन बँक मॅनेजर, एटीएम कार्ड अधिकारी बोलतोय असे सांगून त्यांच्या बँक खात्याची व एटीएम कार्डची माहिती मोठय़ा शिताफीने काढून घेवून, त्याच एटीएम कार्डधारकाच्या बँकेतील खात्यावर ई-बँकिंगच्या माध्यमातून आर्थिक डल्ला मारुन बँकखातेदाराची फसवणूक करण्याच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गुन्हय़ाच्या संख्येत रायगड जिल्हय़ात वाढ होत आहे.
वडखळजवळच्या डोलवी गावातील श्रीधर राघू पाटील यांना त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून, मी दीपक वर्मा, मुंबईतील अॅक्सीस बँकेच्या एटीएम ब्रॅन्चमधून बोलत असल्याचे सांगून, त्यांच्या एटीएम कार्ड व बँक खात्याची संपूर्ण माहिती घेवून, पाटील यांच्या अॅक्सीस बँकेच्या खात्यातून 49 हजार 62क् रुपये परस्पर काढून घेवून फसवणूक केल्या प्रकरणी, तथाकथित दीपक वर्मा यांच्याविरुद्ध वडखळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
खोपोलीमधील भरत रामसेवक वर्मा यांना देखील अशाच प्रकारे मोबाइलवरुन संपर्क साधून, आर.बी.बँक मॅनेजर बोलतोय सांगून सर्व माहिती घेवून, वर्मा यांच्या खात्यातून ऑनलाइन शॉपिंग करुन त्यांना 28 हजार 5क्क् रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खोपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रायगड जिल्हय़ात एकूणच वाढत असलेल्या आर्थिक गुन्हय़ांच्या पाश्र्वभूमीवर रायगड जिल्हा पोलिसांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा स्वतंत्र शाखा स्थापन केली असून, या शाखेकडे जानेवारी 2क्14 पासून एटीएम कार्डाच्या फसवणुकीचे नऊ गुन्हे तपासाकरिता असल्याची माहिती या शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी दिली आहे.
या व्यतिरिक्त फसवणुकीच्या संदर्भातील काही अर्ज देखील झाले आहेत. एटीएम कार्ड फसवणूक संदर्भातील तपास सुरु असून त्याकरिता आवश्यक माहिती बँकांच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहे.
लवकरच आरोपींर्पयत पोहोचण्यात यश येईल असा विश्वास बडाख यांनी व्यक्त केला आहे. एटीएम कार्डधारकांनी व्यक्तिगत स्तरावर काळजी घेणो आवश्यक असून, आपल्या कार्ड वा बँकेच्या तपशिलाची माहिती कोणीही फोन केल्यास देवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.