खगोलशास्त्रज्ञ एस. एम. चित्रे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST2021-01-13T04:12:02+5:302021-01-13T04:12:02+5:30

मुंबई - भारतीय खगोल संशोधन विश्वातील ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, पद्मभूषण प्रो. शशीकुमार मधुसूदन चित्रे यांचे सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने ...

Astronomer S. M. Pictures passed away | खगोलशास्त्रज्ञ एस. एम. चित्रे यांचे निधन

खगोलशास्त्रज्ञ एस. एम. चित्रे यांचे निधन

मुंबई - भारतीय खगोल संशोधन विश्वातील ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, पद्मभूषण प्रो. शशीकुमार मधुसूदन चित्रे यांचे सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात निधन झालेे. ते ८४ वर्षांचे होते. स्टिफन हॉकिंग्ज यांचे ते समकालीन होत. चित्रे यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. चित्रे यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

देशातील खगोलशास्त्र विशेषत: सौर भौतिकी या शाखेच्या अभ्यासकांमधील अध्वर्यू असलेले एस. एम. चित्रे हे टीआयएफआरमधून २००१ मध्ये निवृत्त झाले. मुंबई विद्यापीठातील अणुऊर्जा खात्याच्या सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेसची बांधणी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

त्याचबरोबर चित्रे यांनी नेहरू सेंटर, जेएन टाटा ट्रस्ट यांच्या संचालक मंडळावर अनेक वर्षे काम केले. ते अस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष होते.

विज्ञान शिक्षण आणि प्रसार हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यासाठी त्यांनी जगभरातील शाळा, महाविद्यालयांत असंख्य व्याख्याने दिली. विशेष म्हणजे नेहरू तारांगणमधील पहिल्या कार्यक्रमाला त्यांचा आवाज लाभला होता.

सात मे, १९३६ रोजी मुंबईत जन्मलेल्या चित्रे यांचे महाविद्यालयीन शिक्षण एलफिन्स्टन कॉलेजमध्ये झाले. सौर भौतिकी, खगोलशास्त्र, सूर्याचे चुंबकीय क्षेत्र, सौर वातावरण हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. १९६२-६३ या काळात पीएच.डी.साठी संशोधन करताना त्यांनी स्टिफन हॉकिंग्ज यांच्यासोबत काम केले. त्यानंतर चित्रे यांनी लीड्स विद्यापीठ, कॅलिफोर्नियातील इन्स्टिट्यूट फॉर टेक्नॉलॉजीमध्ये काम केले. १९६७ मध्ये ते टीआयएफआरमध्ये रुजू झाले.

Web Title: Astronomer S. M. Pictures passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.