उल्हासनगरचे सहायक पोलीस आयुक्त लाच घेताना अटकेत
By Admin | Updated: December 21, 2014 01:54 IST2014-12-21T01:54:45+5:302014-12-21T01:54:45+5:30
शहराचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुभाष खाडे यांच्यासह पोलिस शिपाई भरत मोरे यांना एका व्हिडीओ पार्लर दुकानादारकडून ४० हजाराची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयात रंगेहात अटक केली.

उल्हासनगरचे सहायक पोलीस आयुक्त लाच घेताना अटकेत
सदानंद नाईक ल्ल उल्हासनगर
शहराचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुभाष खाडे यांच्यासह पोलिस शिपाई भरत मोरे यांना एका व्हिडीओ पार्लर दुकानादारकडून ४० हजाराची लाच घेतांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयात रंगेहात अटक केली.
उल्हासनगरात एका व्हिडीओ पार्लर दुकानदाराने सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाकडे व्हीडिओ पार्लरची लेखी परवानगी ३ दिवसांपूर्वी मागितली होती. ही परवानगी देण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त २खाडेंच्या कार्यालयातील पोलिस शिपाई
भरत मोरे यांनी पार्लर परवानगीसाठी ४० हजार व दरमहा २० हजार रूपयांची मागणी सहाय्यक आयुक्तांच्या वतीने केली होती.
या प्रकाराला कंटाळून पार्लर दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेवून तक्रार केली होती.
व्हिडीओ पार्लर दुकानदाराच्या तक्रारी व मोबाईल संभाषणावरून लाचलुचपत प्रतिंबंधक विभागाने खाडेंच्या पवई चौकातील कार्यालयात सापळा लावला होता. शनिवारी रात्री आठच्या सुमारास या कार्यालयात पार्लर दुकानदारांकडुन खाडे यांच्यासमोर पोलीस शिपाई भरत मोरे यांनी ४० हजाराची लाच घेतली.
त्याचवेळी लाचलुचपत विभागाने मोरे यांना रंगेहात पकडले. त्यानंतर खाडे आणि मारे या दोघांनाही अटक करण्यात आली. याप्रकाराने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.