गावच्या विकासासाठी सहकार्य
By Admin | Updated: May 15, 2015 00:02 IST2015-05-14T21:39:06+5:302015-05-15T00:02:36+5:30
ग्रामस्थांची मदत : तिवरे वाळवेवाडी शाळेला मुंबई मंडळातर्फे संगणक, प्रिंटर प्रदान

गावच्या विकासासाठी सहकार्य
कणकवली : गावच्या विकासासाठी मुंबईचे मंडळ नेहमीच सहकार्य करेल. शाळेची गरज ओळखूनच शाळेला संगणक संच भेट देण्याचा निर्णय मुंबई विकास मंडळाने घेतला. याचा उपयोग या शाळेतील विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. यापुढेही शाळा व गावातील विकासकामांसाठी मंडळ सदैव मदतीचा हात पुढे करेल, असे प्रतिपादन तिवरे वाळवेवाडी विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष सुहास वाळवे यांनी तिवरे येथे केले.
तिवरे वाळवेवाडी शाळेला वाळवेवाडी विकास मंडळाच्यावतीने बुधवारी संगणक, प्रिंटरचा संच भेट देण्यात आला. वाळवेवाडी येथील महापुरुष मंदिराच्या मंडपात झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सरपंच सतीश वाळवे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुहास वाळवे, उपाध्यक्ष विजय वाळवे, सचिव प्रकाश वाळवे, ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत वाळवे, गंगाराम वाळवे, पांडुरंग वाळवे, मुख्याध्यापिका संजना चिंदरकर, बालवाडी शिक्षिका अनिता वाळवे उपस्थित होते.
चंद्रकांत वाळवे म्हणाले, शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांनाही ज्ञान मिळाले पाहिजे. शाळेला दिलेल्या संगणकाचा योग्य वापर करून येथील विद्यार्थ्यांनी संगणक साक्षर बनावे व गावाचे नाव उज्ज्वल करावे. चिंदरकर म्हणाल्या, शाळेच्या आवश्यक गरजा मुंबई मंडळाला सांगितल्यावर तातडीने मंडळाच्यावतीने संगणक संच
देण्यात आला. याबद्दल खूप समाधान वाटते. मुलांना संगणक हाताळणे सोपे जाईल, यासाठीचे शिक्षण
आम्ही देण्याचा प्रयत्न करू.
यावेळी शाळेसाठी नेहमी मदतीचा हात पुढे करणाऱ्या टेमकर कुटुंबीयांच्यावतीने शाळेची गरज ओळखून ड्रम सेट व खंजिरी मुख्याध्यापिका चिंदरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश वाळवे यांनी केले. कार्यक्रमाला ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)
यांनी दिली मदत$$्न्नितिवरे वाळवेवाडी शाळेला वाळवेवाडी विकास मंडळातर्फे बुधवारी संगणक, प्रिंटरचा संच भेट देण्यात आला.
टेमकर कुटुंबीयानेही शाळेची गरज ओळखून ड्रम सेट व खंजिरी मुख्याध्यापिका चिंदरकर यांच्याकडे सुपूर्द केला.