पवईतील तरुणावर प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:08 IST2021-06-09T04:08:20+5:302021-06-09T04:08:20+5:30
मुंबई : पवई परिसरात राहणाऱ्या इसाकीमुत्तु तेवर या तरुणावर गणेश मोरे, डिल्लू व आनंद परेर यांनी प्राणघातक हल्ला केला. ...

पवईतील तरुणावर प्राणघातक हल्ला
मुंबई : पवई परिसरात राहणाऱ्या इसाकीमुत्तु तेवर या तरुणावर गणेश मोरे, डिल्लू व आनंद परेर यांनी प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात त्रिकुटाविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर तेवर यांच्यावर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
........
ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
मुंबई : परदेशामध्ये मटेरियल सप्लाय करण्याचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पूर्व सायबर विभागाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी अनिल गायकवाड, विशाल गायकवाड, जब्बार शेख, संजय दळवी आणि रफीक अली या आरोपींना नुकतीच अटक करण्यात आली आहे.
.........
धारावीतील हद्दपार आरोपीला अटक
मुंबई : हद्दपार केले असतानाही धारावी परिसरात फिरणाऱ्या आरीफ नासीर शेख ऊर्फ चिना आरीफ (३८) याला धारावी ६ जून रोजी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुकी केली हाेती. त्यानंतर त्याला हद्दपार करण्यात आले हाेते.
..............................................