आसामी महिलेस देहविक्रीसाठी विकले

By Admin | Updated: February 13, 2016 23:40 IST2016-02-13T23:40:41+5:302016-02-13T23:40:41+5:30

नोकरीच्या बहाण्याने आणलेल्या २२ वर्षीय महिलेला मुंबईत वेश्याव्यवसायासाठी विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, इतर

Assamese woman is sold for sex | आसामी महिलेस देहविक्रीसाठी विकले

आसामी महिलेस देहविक्रीसाठी विकले

नवी मुंबई : नोकरीच्या बहाण्याने आणलेल्या २२ वर्षीय महिलेला मुंबईत वेश्याव्यवसायासाठी विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
आसाममधील महिला दोन लहान मुलांसह नोकरीच्या शोधात पनवेलमध्ये आली होती. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर काही दिवस डांबून ठेवून मुंबईत कंपनीत नोकरीला लावतो, असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र तिला कुंटणखाण्यात ४० हजार रुपयांना विकले. याला तिने विरोध केल्यामुळे तिच्या मुलांपासून लांब ठेवण्यात आले. अखेर मुलांच्या सुटकेच्या प्रयत्नात तिने ग्राहकाच्या मदतीने पतीला संपर्क साधला. पतीने नवी मुंबई पोलिसांशी संपर्क साधत त्यांची सुटका केली. कळंबोली पोलिस व गुन्हे शाखेचे पथक अधिक तपास करीत आहे.

Web Title: Assamese woman is sold for sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.