Join us  

बाळासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे पैलू उगडणार राष्ट्रीय स्मारक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 7:06 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणाऱ्या आणि त्यांच्या कणखर नेतृत्वाची साक्ष देणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात करण्यात आले.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणाऱ्या आणि त्यांच्या कणखर नेतृत्वाची साक्ष देणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात करण्यात आले.राज्य शासनातर्फे १४ महिन्यांमध्ये हे भव्यदिव्य स्मारक उभारले जाईल. त्यासाठी ४०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अरबी समुद्राच्या साक्षीने हेरिटेज बिल्डिंग असलेल्या महापौर बंगल्यात एक भव्य संग्रहालय उभारण्यात येणार असून ते बाळासाहेबांच्या झंझावाती जीवनप्रवासाचे साक्षीदार असेल.स्मारक समितीचे सचिव उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मान्यवरांचे स्वागत केले. टाटा प्रोजेक्ट्सचे योगेश देशपांडे यांनी सादरीकरण केले.   बाळासाहेब अन् सोनचाफासोनचाफ्याची फुुले बाळासाहेबांना विशेष आवडत असत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मारकाच्या ठिकाणी सोनचाफ्याची झाडे लावण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी कळ दाबली आणि ड्रिलिंग मशीनने थेट कामालाच सुरुवात झाली.

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेमुंबई