अस्मिता संघटनेचा तहसीलवर धडक मोर्चा
By Admin | Updated: December 22, 2014 23:01 IST2014-12-22T23:01:07+5:302014-12-22T23:01:07+5:30
मोखाड्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी २२ डिसेंबरला अस्मिता संघटनेच्या वतीने मोखाडा तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

अस्मिता संघटनेचा तहसीलवर धडक मोर्चा
मोखाडा ग्रामीण : मोखाड्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी २२ डिसेंबरला अस्मिता संघटनेच्या वतीने मोखाडा तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. तालुक्यात पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून पावसाळा संपताच येथील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते.
येथे मोठी-मोठी धरणे असूनही या धरणाचे पाणी येथील आदिवासी बांधवाना मिळत नसून ते मुंबईला जाते. हे पाणी प्रथम येथील आदिवासींना मिळावे. तर हजारो लिटर पाणी हे मुंबईला जात नसून अधिकाऱ्यांच्या संगनमताने परस्पर विकले जात आहे. याची चौकशी करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. त्याचबरोबर अनेक मागण्या मोर्चामध्ये करण्यात आल्या असून घरकुल लाभार्थ्यांना हप्ते देण्यात यावेत, रोजगाराची कामे कागदोपत्री न दाखवता कामे प्रत्यक्ष करून या योजनेअंतर्गत ३६५ दिवस रोजगार उपलब्ध व्हावा. मीटर धारकांना अवाढव्य येणारी बिले रास्त दिली जावीत, दारिद्र्यरेषेखालील यादी जाहीर करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)