दुचाकीवरून अष्टविनायक दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:07 AM2021-03-06T04:07:05+5:302021-03-06T04:07:05+5:30

मुंबई : गोरेगाव पश्चिम संकल्पसिद्धी मोतीलालनगर सार्वजनिक उत्सवाचे आजी-माजी कार्यकर्ते यांनी नुकतेच अष्टविनायक दर्शन दुचाकीवरून यशस्वीपणे पूर्ण केले. गेली ...

Ashtavinayak Darshan on a bike | दुचाकीवरून अष्टविनायक दर्शन

दुचाकीवरून अष्टविनायक दर्शन

Next

मुंबई : गोरेगाव पश्चिम संकल्पसिद्धी मोतीलालनगर सार्वजनिक उत्सवाचे आजी-माजी कार्यकर्ते यांनी नुकतेच अष्टविनायक दर्शन दुचाकीवरून यशस्वीपणे पूर्ण केले. गेली ९ वर्षे हे मंडळ अष्टविनायक दर्शन दुचाकीने पूर्ण करीत आहे. संकल्पसिद्धी गणेश मोतीलाल नगर नं. १ येथून प्रारंभ करून पुढे प्रवास चालू करतात व चार दिवसांनी परत देवळाजवळ येऊन सांगता करतात. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येथील गणेशभक्त व रहिवासी उपस्थित होते. स्वत:ची नोकरी - व्यवसाय सांभाळून सेवाभावी प्रामाणिकपणे ही यात्रा दरवर्षी पार पाडली जाते, असे सामाजिक कार्यकर्ते संदीप राजपूरकर यांनी सांगितले. या वेळच्या अष्टविनायक दर्शनात दिनेश तुळसूनकर, समीर राजपूरकर, जनार्दन खोत, जितेंद्र टेंबे, संजय राजपूरकर, नितेश तुळसूनकर, रणजीत पाल, भालचंद्र भुवड, मंगेश साबळे, शशिकांत यात सामील झाले होते.

Web Title: Ashtavinayak Darshan on a bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.