अशोक चव्हाण सोमवारी सूत्रे स्वीकारणार

By Admin | Updated: March 8, 2015 02:34 IST2015-03-08T02:34:33+5:302015-03-08T02:34:33+5:30

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खा. अशोक चव्हाण येत्या सोमवारी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारणार आहेत.

Ashok Chavan to accept formulas on Monday | अशोक चव्हाण सोमवारी सूत्रे स्वीकारणार

अशोक चव्हाण सोमवारी सूत्रे स्वीकारणार

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खा. अशोक चव्हाण येत्या सोमवारी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारणार आहेत. दादर येथील काँग्रेस प्रदेश कार्यालयात ९ मार्च रोजी मावळते अध्यक्ष माणिकराव ठाकरे चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सोपवतील. या कार्यक्रमास काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आदी उपस्थित राहणार आहेत.
नव्या अध्यक्षांच्या नियुक्तीवर जाहीर नाराजी व्यक्त करणारे नारायण राणे या वेळी उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. महत्त्वाच्या नियुक्त्यांवेळी सल्लामसलत केली जावी, असा आक्षेप नोंदवितानाच अमराठी नेत्याकडे मुंबई काँग्रेसचा कारभार सोपविल्याबद्दल राणे यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Web Title: Ashok Chavan to accept formulas on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.