Join us

आशिष शेलार ‘कृष्णकुंज’वर; राज ठाकरे यांच्याशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:10 IST

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शनिवारी सकाळी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी पाऊण तास चर्चा केली. दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली. मात्र याबाबत दोघांनीही अधिकृत दुजोरा दिला नाही.

मुंबई : मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शनिवारी सकाळी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी पाऊण तास चर्चा केली. दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली. मात्र याबाबत दोघांनीही अधिकृत दुजोरा दिला नाही.राज यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपाविरोधी आघाडीत राज यांचा मनसे पक्ष सहभागी होणार का याची चर्चा सुरू झाली. भाजपा-शिवसेनेला मुंबई, ठाणे, नाशिक व पुण्यात रोखण्यासाठी मनसेला राष्ट्रवादीकडून ताकद दिली जाईल, असेही म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर, शेलार यांनी राज यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज यांनी काही ठिकाणी भाजपाविरुद्ध उमेदवार न दिल्याने भाजपाचा मार्ग सुकर झाला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शहरी भागांमध्ये चांगले यश मिळण्याचा भाजपाला विश्वास आहे. मात्र, राज यांनी मनसेचे ताकदीचे उमेदवार मैदानात उतरविले आणि त्यांना स्वत:ही ताकद दिली तर त्याचा तोटा भाजपा-सेनेला होऊ शकतो.

टॅग्स :आशीष शेलारराज ठाकरे