मृत आईच्या राखेचा वृक्ष लागवडी साठी केला उपयोग

By मनोहर कुंभेजकर | Published: November 16, 2023 11:53 AM2023-11-16T11:53:22+5:302023-11-16T11:54:04+5:30

पाच झाडे लाऊन समाजाला दिला पर्यावरणाचा संदेश

ashes of mother used for tree planting in mumbai | मृत आईच्या राखेचा वृक्ष लागवडी साठी केला उपयोग

मृत आईच्या राखेचा वृक्ष लागवडी साठी केला उपयोग

मनोहर कुंभेजकर, मुंबई-सध्या मुंबई सह राज्यात ठिकठिकाणी प्रदूषणाची पातळी वाढली आहे.त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड करा अस संदेश देत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मुंबई अध्यक्ष राजू नेटके यांनी त्यांच्या मृत आईच्या राखेचा वृक्ष लागवडी साठी उपयोग पाच झाडे लाऊन समाजाला पर्यावरणाचा संदेश दिला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,राजू नेटके यांच्या मातोश्री कै .सौ काशीबाई लक्ष्मण नेटके (79) यांचे गेल्या बुधवारी आकस्मित दुःखद निधन झाले.त्यांच्या मागे दोन पूत्र, दोन कन्या,सूना,जावई,नातवंडे असा परिवार आहे. आमचे नेटके कुटुंब दुःखात असतांना,पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आईच्या अस्थींच्या राखेचा वृक्षलागवडी उपयोग करून पाच झाडे लावण्याचा आमच्या कुटुंबाने एकमताने निर्णय घेतला अशी माहिती त्यांनी दिली.

त्यांच्या अस्थी (राख)पूर्ण विसर्जित न करता त्यांची राख आणून  त्यांच्या घराजवळ असलेल्या अंधेरी पश्चिम,डी. एन.नगर, विनायक टॉवर जवळील महानगर पालिका मैदानात पाच झाडे लाऊन त्यांनी पर्यावरणाचे रक्षण करा,वृक्ष लागवड करा असा समाजाला नवीन संदेश दिला. यावेळी माजी आमदार अशोकभाऊ जाधव,माजी नगरसेवक संजय पवार ,माजी नगरसेविका सुधा सिंह , अशोक खाडे , भा .ज.पा.महिला मंडळ अध्यक्षा  सुमन वाघ, शिव नगर सहकारी सोसायटी अधक्ष कासम अन्सारी व सभासद  तसेच जय मल्हार संघटनेचे पी. के. कोकरे व समस्त नेटके,जाधव ,काटकर ,सोनवणे मित्र परिवार उपस्थित होते.

Web Title: ashes of mother used for tree planting in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई